profile

Thoughts become Things!

आपल्या कळतं आहे का नाही हे पण कळावं लागतं! कळतंय का ?


। । श्री । ।


सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
सगळ्यात आधी मी इथे गणपती बाप्पा लिहितो आणि तुम्ही मनातल्या मनात जोरात "मोरया" असे ओरडा. जोरात ओरडलं तरी चालेल .
गणपती बाप्पा..................मोरया. ...............मंगलमूर्ती...................मोरया.

१ २ ३ ४ ...................गणपतीचा जय जय कार.............

आता तुम्ही हे मनातल्या मनात वाचलं असेल किंवा मनातल्या मनात जोरात ओरडून किंवा खरोकर हा लेख / ई-मेल वाचताना ओरडून वाचलं असेल, काही पण चांगलंच आहे. पण देवाचं नाव खणखणीत घेतलं पाहिजे हे खरं आणि आता गणेश चतुर्थीच्या १० दिवसात नाही ओरडणार तर कधी ओरडणार ?
तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा लेख जरा महत्वाचा आहे.महत्वाचा आहे कारण २०२१ च्या गणेश चतुर्थीला मी, आपण इंटरनेटचा वापर हा लोकांपर्यंत चांगली माहिती पोहचवण्यासाठी करूया असं ठरवलं होतं. त्याचं दिवशी मी माझा पहिला सोलो पॉडकास्ट हा स्पोटिफाय वर टाकला पण होता. त्या एपिसोडचं नावं होतं "#१ उद्योजक गणपती बाप्पा". तो आजही स्पोटिफाय वर उपलब्ध आहे. तुम्हाला ऐकण्याची इच्छा असेल तर ही आहे लिंक. हसायचं नाही पण. पहिल्यांदाच बोलत होतो मी असं तर चुका आहेत बऱ्याच.

माझा पहिला पॉडकास्ट ऐकण्यासाठी इथे क्लिक करा!


मी का दिवशी पॉडकास्ट रेकॉर्ड केला माहिती? मी वेगवेगळे पुस्तक वाचतं असतो ना तर माझ्या लक्षात आलं की इंटरनेट वर २ प्रकारचे लोकं आहेत.

  • Consumer (इंटरनेट वापरणारे )
  • Creator (इंटरनेटचा योग्य वापर करून घेणारे)


माझ्या लक्षात आलं की मी बिझनेस बद्दल इतकी माहिती घेतो, पुस्तकं वाचतो पण इंटरनेट हे एक असं माध्यम होतं जिथून मी पैसे न कमावता माझा वेळ आणि पैसे घालवत होतो. हे लक्षात येताच मी ठरवलं की आपला एक क्रिएटर म्हणून प्रवास सुरु झाला पाहिजे. तर तो प्रवास ह्या पहिल्या पॉडकास्ट पासून सुरु झाला.
मी त्या पॉडकास्ट मधे कसे आपण गणपती बाप्पांचे गुण घेतले की उद्योजक बनायला तयार होतो हे सांगितलं होतं. म्हणजे जसे गणपती बाप्पांचे मोठे कान आहेत, तसेच जर उद्योजक बनायचं असेल तर आपल्याला नीट आणि लक्ष पूर्वक ऐकणारा व्यक्ती बनाव लागेल. असे मी वेगवेगळे उदाहरणं दिले आहेत. तुम्ही ऐकू शकता.


पण आज पुन्हा मी तोच विषय का घेतो आहे? कारण मागच्या काही वर्षात मी परमार्थाचा थोडा थोडा अभ्यास सुरु केला आणि माझ्या लक्षात आलं की कलियुगात जर कुठल्या देवाला नमस्कार करावा तर ते देव म्हणजे देवी आणि गणपती हे दोन आहेत. बाकीचे पण आहेत पण विशेष करून देवी आणि गणपती.

का?

आजचं युग हे इन्फॉर्मशन ने पूर्णपणे भरलेलं आहे. तुमची इच्छा जरी नसेल तरी वेगवेगळ्या माहितींचा तुमच्यावर कायम मारा चालू आहे. जाहिरात, न्यूज, कोणाचे तरी स्टेटस, कोणाचं तरी सांगणं, कुठे तरी मोठ्या बोर्ड वर लिहिलेलं वाचणं असे कुठल्या न कुठल्या प्रकाराने माहिती मिळतेच आहे. पण ह्या सगळ्या माहितींपैकी आपल्या कामाची कुठली हे ज्याला समजतं ना त्याच्यावर गणपती बाप्पांनी विशेष कृपा केली समजा.
कारण गणपती ही विद्येची देवता आहे. आपण आपल्याला काहीतरी कळलं म्हणतो ना, हे जे कळलं आहे ना हे गणपती बाप्पांमुळे होतं. विचार करा ना शाळेमधे ५० जणांना शिक्षक शिकवतात पण प्रत्येकाला वेगळं वेगळं कळतं ना? कोणाला जास्त कोणाला कमी. इथे आहे गणपती.



तर गणपतीची इच्छा असेल तर आपल्याला कळतं हे तुम्हाला कळावं म्हणून मी हा लेख लिहितो आहे. कळलं का?


असो, विनोद बाजूला ठेवू आणि खरोखर गणपती ला एकदा मनामध्ये आठवून नमस्कार करा. काय काय कळतं बघा ना आपल्याला. एक नाही १००० च्या वर गोष्टी आपण शिकलो आहोत हे सगळं काही आपण वाचत गेलो, ऐकत गेलो, शिकत गेलो, आणि एक एक करत कळतं गेलं. म्हणून तो नमस्कार करावा म्हणून मनापासून थँक यू म्हणावं. ह्या प्रचंड शक्ती असलेल्या गणपती बाप्पांनी जर प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजावी अशी काही जादू केली ना तर बघा ना किती सोप्या होतील गोष्टी.


मी एक उदाहरणं देतो. माझ्या शहरात जेंव्हा जेंव्हा मला रेल्वे गेटवर थांबावं लागतं मी तेंव्हा तेंव्हा पाहिलेलं आहे की मी डाव्या बाजूला उभा असतो आणि माझ्या समोरचे माझ्या उजव्या बाजूला उभे असतात. आता गणपती बाप्पांची इच्छा म्हणा पण हे किती सोप्प आहे ना. रेल्वे गेली गेट उघडलं की मी सरळ जाणार कारण माझ्या समोरची बाजू पूर्णपणे मोकळी आहे आणि माझ्या समोरचे जे उजवीकडे उभे आहेत त्यांच्या साठी त्यांच्या समोरची, म्हणजे माझ्या उजव्या बाजूची जागा पूर्णपणे मोकळी आहे. कितीही जण मागे का असेना सगळे एका मागे एक करतं सरळ निघून जातील आणि मी सरळ निघून जाईल. कोणालाही गर्दीही त्रास होणार नाही. कितीही गर्दी असेल तरी.


पण आता बघा मी का म्हणतो गणपती बाप्पांची इच्छा नाही कळण्याची ते. काही जण मी जर समोर उभा असेल डाव्या बाजूला तर मागून येउन उजवीकडे येऊन उभे रहातात. असे १५ -२० जणं करतात आणि हीच गोष्ट समोरच्या बाजूचे काही जणं करतात. आता जिथे प्रत्येकाला एक बाजू पूर्णपणे मोकळी मिळते ते न होता दोन्ही बाजूंचे (घोडे स्वार - नेहिमी घोड्या वर असतात म्हणून) गाडी स्वार गेट उघडलं की एक मेकांसमोर येऊन कशी तरी वेडी वाकडी करत गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. आणि मग जे काही होतं त्याला म्हणतात ट्रॅफिक जॅम.

तुम्ही नक्कीच अश्या जॅमचा अनुभव घेतला असेल जर तुम्ही भारतात आहात तर. आता ही किती साधी आणि समजणारी गोष्ट आहे. पण कदाचीत गणपती बाप्पांची कधी पूजा केली नसावी आणि त्यांना मला समजण्याची समज दे असं मागितलं नसेल ह्या ट्रॅफिक करणाऱ्या लोकांनी असं मला नेहिमी वाटतं.
त्यांना समजेल तेंव्हा समजेल तुम्ही जर रेल्वे गेट च्या समोर थांबला आहात तर नक्की डाव्या बाजूला थांबून उजवी बाजू कशी मोकळी ठेवता येईल हा विचार आणि कृती नक्की करा.


तर अश्या गणपती उत्सवाच्या काळात आपलं पत्र येतं आहे तर मी गणपती बाप्पानां ही विनंती नक्की करेल की माझाव्यापार च्या सगळ्या वाचकांना समजण्याची समज द्यावी.


पूजेत गणपती असला तरी आपण गणपतीची नवीन मूर्ती का आणतो?


कारण श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल. जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते, कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जित करतात.


जर इतक्याच गणेशलहरी आहेत तर त्यापकी काही आमच्या वाचकांच्या डोक्यात जाऊ देतं आणि त्यांना समजू दे गणपती बाप्पानां दररोज नमस्कार करण्याचे महत्व. एकदा का गणपती बाप्पा प्रसन्न झाले की मग बिझनेस काय, पुस्तकं वाचणं काय, पैसे कमवणे काय, पैसे साठवणे काय, इन्व्हेस्ट करणे काय, व्यायाम काय, लोकांना मदत करणे काय, इंटरनेट चा वापर क्रिएटर होण्यासाठी करणे काय आणि लिहिणं किती महत्वाचं आहे काय सगळंच एक एक करत समजायला लागेल.
तर अश्या गणेशलहरींनी तेजस्वी दिसणारा एक गणपती बाप्पा मी AI चा वापर करून बनवला आहे. त्या गणपती बाप्पाचं दर्शन नक्की घ्या.

आणि आम्ही लवकरचं आमचे व्हिडिओ (zoom) द्वारे होणारे आणि ज्या मधे इंटरनेट वर उपलब्ध असणाऱ्या गोष्टी कश्या योग्य पद्धतीने वापरून आपण आपल्या बिझनेस मधे चांगले बदल घडवून आणू शकतो हे शिकायचे कॉल्स सुरु करत आहोत. आपल्या पैकी कोणाचीही इच्छा असेल तर तुम्ही तो कॉल जॉईन करू शकतात. ह्या ई-मेल ला रिप्लाय करा किंवा ajinkya@mazavyapar.com ह्या ई-मेल वर तुमची जॉईन होण्यासाठीची रिकवेस्ट पाठवा. आम्ही लगेच तुम्हाला झूम लिंक देऊ.


आमच्या संपूर्ण लेख वाचल्या बद्दल आपले खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा सांगतो इंटरनेटचा वापर नेमका कसा करावा हे समजून घेण्याची इच्छा असेल तर नक्की आमच्या पुढच्या झूम मिटिंग ला कनेक्ट करा. ही झूम मिटिंग आपल्या फार कामाची ठरेल हे समजण्याची समज गणपती बाप्पांकडून मिळू दे म्हणजे झालं.


भेटूया पुढच्या पत्रात.


अर्धा लाडू चंद्रावर . ............................गणपती बाप्पा उंदरावर .

..........गणपती बाप्पा..................मोरया .

...............मंगलमूर्ती...................मोरया . ...........

Reader, एक सांगायचं होतं....

हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.

आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.

माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.

तुमचा मित्र,

अजिंक्य कवठेकर

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page