profile

Thoughts become Things!

Are you a DOS Game lover?


।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

स्वागत आहे एका नव्या पत्रात आज माझ्याकडे बोलण्यासारखं (म्हणजे मी लिहिण्यासारखं आणि तुम्ही वाचण्यासारखं) भरपूर काही आहे. प्रश्न असा आहे की हे सगळं मी एका पत्रात कसं बसवू?

मी हे माझे पत्र म्हणजे ई-मेल न्यूजलेटर, आठवड्याला लिहितो आणि सात दिवसांमधल्या माझ्या सोबतच्या घडामोडी, काही चांगल्या गोष्टी, काही वाईट, पण ज्या मधून मी चांगलंच घेतो अश्या काही गोष्टी लिहून काढतो आणि मग काही जण ते वाचून मला रिप्लाय पण देतात. असा एक क्रम मागच्या काही वर्षांपासून बनला आहे.

या आठवड्यात मी २ प्रत्येकाने बघावे असे चित्रपट पहिले. हे कुठले ते मी सगळ्यात शेवटी सांगेल. मी एक डॉक्युमेंट्री फिल्म पण पहिली नेटफ्लिक्स वर. ती पण सांगतो कुठली ते. मी एक बुक रिडींग क्लबला गेलो होतो. हा अनुभव एक वेगळाच होता. एक पुस्तक वाचतो आहे असं काय काय लिहावं आता पण मी काही निवडक मुद्दे सांगतो.

Future of Gaming.

तुम्ही कंप्युटर गेम्स खेळले आहेत का?

आजचा विषय खरं तर मी ठरवला होता तो म्हणजे गेम्स. का बरं ते सुद्धा सांगतो. मागच्या काही वर्षांपासून तुम्ही जर इंटरनेट वापरणारे आहात तर तुम्हाला एक गोष्ट सगळीकडे दिसेल ती म्हणजे GTA 6 या गेम बद्दलची चर्चा. का हा गेम इतका चर्चेचा विषय बनला आहे? ह्या गेम च ट्रेलर एका वर्षा पूर्वी आलं होतं म्हणजे २०२३ ला. त्या मधे त्यांनी सांगितलं की हा गेम २०२५ मधे येणार आहे. तर काही जणांनी अश्या कमेंट केल्या होत्या की थोडा लवकर घेऊन या गेम मला मरायच्या आधी हा गेम खेळायचा आहे. इतके कसे कोणी एका गेम साठी पागल असू शकतात?

एक सहज अंदाज यावा म्हणून मी हा एक चार्ट इथे दिला जो २ वर्ष जुना आहे पण तरी तुम्ही समजू शकतात मोठ्या मोठ्या २ इंडस्ट्री एकत्र केल्या तरी व्हिडिओ गेम इंडस्ट्रीला मागे टाकणं अवघड आहे इतका मोठा बिझनेस आहे.

लोकं गेम्स साठी इतके वेडे कसे असतात?

Some people play games like this!

गेम्स हे बनवलेच अश्या पद्धतीने आहेत की खेळणाऱ्याला “आता खेळणं बंद करू” अशी भावना मनामधे आलीच नाही पाहिजे. आणि हे करण्यात ही इंडस्ट्री शंभर टक्के यशश्वी झाली आहे. छोटे किंवा मोठे तुम्ही कोणालाही गेम्स खेळण्यात गुंग झालेले बघू शकतात.

माझ्या लहानपणी मला गेम्स खेळण्याची सुरवात कुठून झाली हा प्रश्न विचारला तर माझ्या वयाचे खूप जण हेच उत्तर देतील. डॉस बेस एक गेम होता ज्याचं नाव होतं डेव्ह.

तुमच्या पैकी किती जणांना माहिती होतं डेव्ह या गेमच नाव डेंजरस डेव्ह आहे?

अल्लादिन हा ३० वर्ष जुना गेम आहे.

त्या नंतर प्रिन्स, अल्लादिन, स्काय लिस्ट फार मोठी आहे. तुम्हाला पण हे लहानपणीची गेम्स खेळावे वाटतात का? पण आता कुठे आलं डॉस कॅम्पुटर? आता कसे खेळणार? हेच तर काम आहे आमच्या पत्रांचं. एक वेबसाईट सांगतो त्या वर सगळे जुने डॉस चे गेम्स फुकट खेळता येतात. PLAYDOSGAMES.COM नक्की खेळा आणि आज तुमच्या मधला तो लहान मुलगा पुन्हा जागा करा.

लोकं गेम्स साठी वेडे नाहीत. गेम्स हा प्रकारचं अश्या पद्धतीने बनवला जातो की एखाद्याला कामं सोडून त्या गेम मधली एखादी लेव्हल पूर्ण करणं महत्वाचं वाटलं पाहिजे. गेम्स हे एक कमालीचं साधन आहे जर तुम्हाला चिकाटी ही सवय तुमच्या मनात घालायची असेल तर.

माझी एक सवय आहे ज्याला इंग्लिश Perseverance म्हणतात आणि मराठी मधे चिकाटी. जो पर्यंत माझ्या मनासारखं मला मिळत नाही तो पर्यंत प्रयत्न करणे म्हणजे चिकाटी. सातत्य म्हणजे तीच गोष्ट परत परत करणे. पण काही जण सातत्य ठेवूनही पाहिजे ते ध्येय मिळालं नाही की थांबतात पण जो थांबत नाही ना, कामाला चिटकून रहातो ती सवय म्हणजे चिकाटी आणि ही चिकाटी मी गेम्स खेळत खेळतच शिकलो. एक लेव्हल जमत नाही म्हणून मी इतकेदा खेळायचो की मला ती काही दिवसात खूपच सोपी वाटायला लागायची.

गेम्स खेळणं चांगलं का वाईट?

हा असा अवघड प्रश्न नेमका गेम्स खेळणाऱ्या व्यक्तीलाच विचारला तर कसं जमेल? पण मी अगदी सरळ उत्तर देतो. अति सर्वत्र वर्ज्ययेत कुठलीही गोष्ट अति झाली की काहीतरी गडबड झालीच समजा. मग तो गेम्स असो किंवा काहीही. एका लिमिट मधे कुठल्याही गोष्टीचा आनंद घेता येतो आणि त्या मधून शिकता येतं. तेच सगळं ह्या गेम्स बद्दल पण आहे.

मला फक्त इतकचं वाटतं की गेम्स बद्दलचा awareness शाळांमधून दिला गेला पाहिजे. कारण गेम्स आता फक्त वेळ घालवण्याचं साधन नाही राहिलेलं. कित्तेक गेम्स मधे पैसे लावता येतात. आपल्या खिशातले, बँक मधले खरे पैसे. गेम्स मधले खोटे पैसे नाही.

वेळ, पैसा, आरोग्य अश्या कित्तेक गोष्टी वर खाली होऊ शकतात जर गेम्स मधून काय घ्यावं, किती घ्यावं आणि केंव्हा सोडावं हे समजलं नाही तर. म्हणून गेम्स फक्त रिकाम्या लोकांचे काम आहे. गेम्स चांगले नाही. हे असं काहीतरी शिकवण्यापेक्षा प्रमाणात खेळणं चांगलं कसं हे शिकवण्यावर जोर दिला गेला पाहिजे. हे माझ्या मते उत्तर आहे गेम्स चांगले का वाईट या प्रश्नाचं.

आता सांगतो फिल्म्स बद्दल ज्या तुम्ही वेळ काढून बघितल्या पाहिजे.

Movie Suggesation 1

Ready Player One - नेटफ्लिक्स

हा चित्रपट गेम्स बद्दलचाच आहे. काही वर्षानंतर कसे लोकं ह्या गेम्सच्या जगात हरवून जातील आणि आपलं खरं जग विसरून जातील आणि मग काय का होऊ शकतं हे सगळं काही ह्या चित्रपटात तुम्ही बघू शकतात. स्टिव्हन स्पीलबर्ग सारख्या उत्कृष्ट दिग्दर्शकाचा चित्रपट नक्की वेळ काढून बघावा.

तुम्हाला असे काही जण माहिती असतील जे खरोखरच्या जगात अगदी शांत, न बोलणारे, कोणामधे न मिसळणारे

असतात पण तेच ऑनलाईन जगात हिरो असतात. तसे काही जण या चित्रपटात बघायला मिळतील. पण ज्याला भविष्यात काय होणार ह्या विचारांच्या फिल्म्स आवडत असतील तर Ready Player One हा चित्रपट तुमच्या साठी आहे.

Movie Suggestion 2

पुष्पा - दी रुल

साऊथ इंडियन म्हणजेच दक्षिण भारतातले चित्रपट हे दिवसेंदिवस आपली क्रिएटिव्हिटी वाढवतं च चालले आहेत. काय म्हणावं सुकुमार दिग्दर्शकाच्या क्रिएटिव्हिटी ला? आनंद आनंद वाटला बस्स. हेच बघण्यासाठी आलो होतो, थँक यू असं मनापासून म्हणावं वाटलं. मी एक उदाहरणं देतो. व्हिलन हिरो च्या बहिणीला पकडून नेतो आणि हिरो ला म्हणतो की इतके इतके पैसे दे नाही तरी हिला मारून टाकेन. मग हिरो येतो. व्हिलन आणि त्याच्या गॅंग सोबत मारामारी करतो आणि व्हिलनला मारून बहिणीला घेऊन जातो. हे आपण सगळ्यांनी कुठल्या ना कुठल्या चित्रपट पाहिलं आहे. हे एक दोनदा बघितल्यावर तिसऱ्या वेळेस आपण म्हणू ठीक आहे माहिती होतं असं होणारं आहे. पण जे तुम्ही, मी विचारच करू शकत नाही असं काहीतरी पुष्पा चित्रपटाच्या शेवटी होतं आणि जे काही दाखवलं आहे ते अशक्यच आहे. पण असं बघून सुद्धा आपल्याला छानच वाटतं. आपणही थिएटर मधल्या सगळ्यांसोबत ओरडतो. ही जादू आहे साऊथ मधल्या फिल्म्स ची.

ही जादू कशी उभी करतात ते शिकण्यासाठी त्याचा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट बघावा”च”.

मी एका डॉक्युमेंट्री फिल्म बद्दल आणि बुक रिडींग क्लब बद्दल पण सांगतो असं सुरवातीला म्हणालो होतो

पण किती लिहावं एका पत्रात. त्या फिल्म बद्दल आपण पुढच्या पत्रात बोलू.

सध्यातरी सांगण्यासारखं खूप काही आहे पण मी इतकंच सांगेल की भरपूर मेहनत करा, गेम्स खेळा, चित्रपट बघा या सगळ्यांमधून शिका आणि ते आपल्या उद्याच्या कामात पुन्हा वापरा. आपण वेगवेगळे अनुभव माझ्या सोबत चांगलं झालं, माझ्या सोबत वाईट झालं इतकंच बोलण्यासाठी घेत नाहीत. वेगवेगळे अनुभव हे त्यातून काहीतरी शिकून नव्याने काहीतरी करण्यासाठी घेत असतो.

तर अजिंक्य नेहिमीप्रमाणे हेच सांगेल की स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त रहा. भेटूया पुढच्या पत्रात. धन्यवाद.


आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्या Newsletter ला इथे. Email Newsletter
आणि हे पत्र जर नियमित व्हाट्सऍप वर मिळावे असं वाटतं असेल तर ही आहे आमची व्हाट्सऍप कम्युनिटी लिंक इथे.WhatsApp Community

Reader, एक सांगायचं होतं....

हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.

आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.

माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.

तुमचा मित्र,

अजिंक्य कवठेकर

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page