profile

Thoughts become Things!

आणि या वर्षीचा नवीन शब्द आहे..........


।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

स्वागत आहे पुन्हा एका नवीन पत्रात आणि आजच्या पत्रात आपण बोलणार आहोत भाषेबद्दल. असं म्हणलं जातं की जगात ७००० पेक्षा जास्त भाषा आहेत. बरं या ७००० मधे एकाच भाषेच्या ज्या वेगवेगळ्या बोली असतात त्यांचा समावेश नाही. म्हणजे कितीतरी भाषा आपण निर्माण केल्या ही कमालच आहे.

आता या सगळ्या भाषांमधे इंग्लिश एक गरीब पण भाग्यवान भाषा आहे. गरीब का म्हणावं तर पहिले इंग्लिश ही माझी मातृ भाषा नाही आणि दुसरं म्हणजे खूप सारे इंग्लिश मधे असे शब्द आहेत जे लिहले वेगळे जातात आणि त्यांचे उच्चार वेगळे होतात. पण हे पत्र इंग्लिश चांगली आणि कुठली तरी वाईट अश्या प्रकारचं नाहीये. पॉईंट हा आहे की इतक्या सगळ्या भाषांमधे इंग्लिश ही संपूर्ण जगाने स्वीकारलेली भाषा आहे, आणि ती तुम्हाला मला आलीच पाहिजे.

ह्याच इंग्लिश मधे Oxford English Dictionary म्हणजेच शब्दकोश आहे जो खूप वर्षांपासून इंग्लिश भाषेचे शब्द, इतिहास, वापर ह्या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन करतो. लगेच एक उदाहरणं देतो. इंग्लिश भाषा आपल्या जीवनात अश्या प्रकारे घुसलेली आहे की मी आत्ता डॉक्युमेंटेशन ला दस्तऐवजीकरण हा शब्द वापरला असता ना, बऱ्याच जणांना समजलं नसतं. इंग्लिश पण आपल्या मराठीमधे मिक्स झालेली आहे.

तर ही जी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी आहे ना ती दर वर्षी काही नवीन शब्द त्यांच्या शब्दकोशात डॉक्युमेंट करते. आता हे शब्द म्हणजे काही नवीनच शब्द असतात असं काही नाही. थोडे जुने पण शब्द असू शकतात पण जे शब्द त्या वर्षात जास्त करून वापरले जातात त्या पैकी काही निवडून वर्ड ऑफ दी इयर मधे येतात.

आता हे तुम्हाला माहिती असेल तर ठीक पण माहिती नसेल तर लगेच प्रश्न डोक्यात आला आले मग या वर्षीचा शब्द नेमका कुठला? तेच सांगण्यासाठी किंवा ह्याच विषयावर बोलावं म्हणून आजचं पत्र आहे. मागचं पत्र वाचलं नसेल तर इथे क्लिक करून तुम्ही ते वाचू शकतात. Are you a DOS game lover?

ह्या वर्षीचा OEDने निवडलेला शब्द आहे:

Brain Rot

हा शब्द तुम्ही नक्कीच कुठे ना कुठे ऐकला किंवा वाचला असेल. याचा अर्थ गुगल करून बघितला तर काहीच येत नाही. मोठे मोठे लेख, व्हिडिओ सापडतील पण ब्रेन म्हणजे मेंदू हा जसा अर्थ येतो ना, तसा अर्थ नाही सापडणार. कारण असा कुठला शब्दचं नाहीये. आपल्या वागण्यामुळे, आपल्या सवयींनमुळे तयार झालेला हा शब्द आहे.

अगदी शब्दा शब्दाचा अर्थ बघितला तर तो असा होतो.

ब्रेन म्हणजे मेंदू. रॉट म्हणजे सडणे, कुजणे किंवा निरुपयोगी करणे.

मेंदू सडणे हा त्याच्या अर्थ, शब्दाला जर शब्द असं भाषांतर केलं तर होतो.

पण मेंदू का सडेल?

आता समजून घ्या. कोणा कोणाला छान गादीवर झोपून, डोक्याखाली उशी घेऊन, कधी पाठीवर, कधी पोटावर, कधी एका अंगावर असं करत करत रिल्स किंवा इंटरनेट बघतं बसायला आवडतं? आणि मी हे ५ मिनिटं करणे ह्या बद्दल बोलत नाहीये. असं पडून बघता बघता किती वेळ जातो कळतही नाही मी त्या बद्दल बोलतो आहे. कधी कधी सकाळचे ४ वाजलेले असतात आणि आपण फोन रात्री १२ ला हातात घेतलेला असतो. होतं की नाही असं? ह्याला ब्रेन रॉट नाही म्हणत. हे सतत केल्यामुळे जे काही होतं त्याला ब्रेन रॉट म्हणतात. अश्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण थोडक्यात काय तर खूप जास्त स्क्रीन टाइम मुळे होणारा हा एक आजार आहे असं म्हणू शकतो.

ब्रेन रॉट मधे नेमकं काय होतं तर ह्यात आपली मानसिक आणि बौद्धिक शक्ती कमी होते.

संपूर्ण मन एकाग्र करून एखादं काम करणे हे पण आजकाल कमी झालेलं आहे. कारण अडथळेच इतके आहेत की मन एकाग्र होणारं तरी कसं? मिनिटामिनिटाला जर आपला फोन आणि त्या मधले अप्प्स त्यांच्या फायद्यांसाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला फोन उचलायला भाग पाडतात.

म्हणून मी नोटिफिकेशन नेहिमी ऑफ ठेवा असं सांगतो. तशी पण आपल्या सगळ्यांना अर्ध्या अर्ध्या तासाला फोन बघण्याची सवय लागली आहे तेंव्हा बघा काही मेसेज आला आले तर का बरं फोन मेसेज साठी वाजल्यावर तो पुढच्या मिनिटाला उचललाच गेला पाहिजे? इतकंच काही अर्जेंट असेल तर समोरचा मेसेज करून सांगायची वाट थोडी बघणार आहे? मेसेज, नोटिफिकेशन हे जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा "आपण फोन न बघितलेल्या वेळात काय काय झालं" हे समजावं म्हणून असतात. काम सोडून बघण्यासाठी नाही.

हे लोकं वर्षाला असे एक-दोन शब्द कसे निवडतात?

त्यांची शब्द शोधण्याची एक पद्धत आहे. पण शेवटी भाषेचे विश्लेषण करणारे काही व्यक्ती आणि सार्वजनिक मत ह्या दोघांचे विचार एकत्र करून ठरवलं जातं. ३७,००० लोकांनी ब्रेन रॉट साठी मतदान केलं. विश्लेषण (Analysis) करणाऱ्यांच्या मते मागच्या वर्षात ऑनलाईन "काहीतरी बघणे" ह्याचं प्रमाण भरपूर वाढलं आहे आणि त्यांच्या मते जितकं निकृष्ट दर्जाच्या गोष्टी ऑनलाईन बघितल्या जातील तितकं ब्रेन रॉटच प्रमाण वाढतं. २०२३ ते २०२४ ह्या एका वर्षात ब्रेन रॉट हा शब्द २३०% जास्त वापरला गेला.

ब्रेन रॉट हा प्रकार मागच्या एका वर्षात वाढत चालला आहे. मला जेंव्हा हे स्वतः बद्दल जाणवलं की आपण जास्त वेळ लक्ष देऊन ऐकू शकतं नाहीये, कुठल्याही गोष्टीचा लगेच कंटाळा येतो आहे, तेंव्हापासून मी काही गोष्टी बदलल्या. जस की इंटरनेट हे फक्त consume करण्यासाठी नाही तर काही तरी create करण्यासाठी वापरायचं.

ब्रेन रॉट पासून दूर कसे रहावे?

ब्रेन रॉट होण्याच्या कारणांमध्ये निकृष्ट दर्जाचं कन्टेन्ट (Low Quality Content) खूप जास्त प्रमाणात पाहिलं की होतो हा एक महत्वाचं कारण आहे. आता कुठला कन्टेन्ट वाईट आणि कुठल्या वाईट हे सांगायचं झालं तर अजून एक पान लिहावं लागेल. ते बाजूला ठेऊ.

आता फक्त इतकं बघूया की कन्टेन्ट बघणं कमी करूया असं आपण जरी ठरवलं असेल तर चांगल्या किंवा वाईट अश्या कन्टेन्ट मधे तुम्हाला दिवसात रात्र अडकवून ठेवावं हे प्लांनिंग करूनच ह्या कंपनी बनलेल्या आहेत. ह्या सगळ्या मोठ्या कंपन्या आहेत ज्यांना तुम्हाला कशी वेळ घालवणारी सवय लावावी आणि आपला पैसे कमवावा हे चांगलं समजतं. त्या मुळे ह्यांना चुकीचं बोलणं, हाय कंपन्या वाईट आहेत म्हणणं हे काही चालणार नाही. त्या सगळ्या कंपन्या काल होत्या, आज आहेत आणि उद्या पण असतील. आज पेक्षा उद्या अजून मोठ्या झाल्या असतील.

पण आपण जे करू शकतो ते बघू :

आपल्या फोन मधे सेटिंग मधे एक सेटिंग आहे. डिजिटल वेल बीइंग किंवा स्क्रीन टाइम ह्या नावाने असेल. ह्या मधे आपण रोज किती वेळ फोन वर घालवतो ते दिसेल. ५ तास, ६ तास जो काही वेळ तिथे दिसेल. आजच्या पेक्षा उद्याचा वेळ कमी आला पाहिजे हा प्रयत्न करा.

त्या नंतर एप्स ना लॉक करण्याची सोय सेटिंग मधे असते. एका ठराविक वेळेनंतर एप्स चोवीस तासानंतरच उघडतात. ती सेटिंग सुरु करून ठेवा.

मी आधी सांगितल्या सारखं, नोटिफिकेशन ऑफ ठेवा. फोन ने मला सांगता कामा नये की तू मला उचल. मी ठरवेल मला कधी फोनला उचलायचं ते.

सोशल मीडिया एप्स हे फक्त कंप्युटर वरूनच वापरा.

आता ह्या मधल्या काही गोष्टी मी वापरतो म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. Doing is Learning हा आमच्या माझाव्यापारचा एक महत्वाचा भाग आहे. आमचा जोर हा इम्पलेमेंटेशन यावर आहे. इम्पलिमेन्ट करणे हे आमच्या साठी वाचणे, ऐकणे, बघणे ह्याच्या पेक्षा वर आहे.

आणि सगळ्यात शेवटी इंटरनेट हे फक्त काहीतरी घेण्यासाठी नाही तर काहीतरी देण्यासाठी वापरा.

मी, "कसा इंटरनेट काहीतरी देण्यासाठी वापर करू?" हा विचार डोक्यात आल्यावर त्याला उत्तर म्हणून हा ब्लॉग, ज्याला न्यूजलेटर सुद्धा म्हणतात, पण मी माझ्या भाषेत ज्याला पत्र म्हणतो ते लिहायला सुरवात केली आणि प्रत्येक आठवड्यात लिहिल्यामुळे मला इतके फायदे झाले आहेत ती एक वेगळीच यादी बनेल. मी "दर आठवड्याला का लिहावे" ह्या विषयाला धरून पण खूप सारे पत्र लिहिले आहेत. माझे जुने पत्र वाचण्याची इच्छा असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकतात.

जुने पत्र वाचा

माझ्या पत्राच्या शेवटी मी इतकंच सांगेल की इंटरनेट कमी बघा पण High Quality Content (जसे की माझाव्यापार चे पत्र) नक्की वाचा, बघा आणि ऐका. बघितलेलं नक्की इम्पलिमेन्ट करा. कारण Doing is Learning.

मी प्रत्येक आठवड्यात मूवी किंवा पुस्तक रिकमेण्ड करतो ना, तर या आठवड्यात माझ्याकडे काही लोकांची नावं आहेत ज्यांना तुम्ही नक्की भेटलं पाहिजे किंवा त्यांना ऐकण्याची संधी मिळाली तर ती सोडली नाही पाहिजे.

त्यापैकी पहिले व्यक्ती आहेत. समीर लिमये.

समीर लिमये

श्री समर्थ रामदास आणि त्यांचं वाङ्मय हे इतकं अफाट आहे की त्या मधे मॅनॅजमेन्ट पासून ते लेखनक्रिया, कीर्तन, राजकारण, बुद्धी चा उपयोग, असे खूप वेगवेगळे विषय सापडतात. अगदी सध्या मराठीत असूनही खूपदा आपल्याला हा ग्रंथ समजून घेण्यासाठी अवघड वाटतो. पण YouTube चा वापर ब्रेन रॉट साठी होऊ न देता ह्या High Quality Content साठी तुम्ही नक्कीच करू शकतात. समीर लिमये ह्यांचे कुठले सुद्धा दासबोधावरच एक प्रवचन उघडा आणि ऐकून तुम्हीच ठरवा का बरं समीर लिमये ह्यांचे प्रवचन परत परत ऐकावे.


आणि दुसरे व्यक्ती आहेत कृष्णकांत माने

कृष्णकांत माने

कृष्णकांतजी हे संपूर्ण भारतातले पहिले Visually Challenged IT Professional आहेत. त्यांची स्वतःची IT कंपनी आहे जिथे ते ERP सॉफ्टवेअर बनवतात. त्यांच्या सोबत ३० जणांची टीम काम करते. त्यांचं सॉफ्टवेअर हे भारतातलं पाहिलं Automated GST billing सॉफ्टवेअर आहे. मी त्यांच्या सोबत जवळपास २-३ तास होतो. आम्ही सोबत जेवण केलं आणि भरपूर गप्पा मारल्या. एखादा व्यक्ती ज्याला सगळं स्पष्ट दिसतं तो जे काही काही करू शकत नाही ते सगळं कृष्णकांत ह्याने केलेलं आहे. करून झालेलं आहे आणि ते अजून खूप काही नवीन नवीन नक्कीच करतील ह्याची मला खात्री आहे.

कृष्णकांत जेंव्हा आमीर खान ह्यांच्या सत्यमेव जयते नावाच्या एका कार्यक्रमात आले होते तो एपिसोड तुम्ही सगळ्यांनी नक्की बघितला पाहिजे. मी इथे खाली लिंक देतो आहे. तुम्ही ह्या खालच्या व्हिडिओ मधे १५ मिनिटांपासून पुढे कृष्णकांत ह्यांचा आमीर खान सोबतच संवाद बघू शकतात.


असेच आमचे पत्र वाचत रहा. आमचे पत्र आवडले तर तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त रहा. धन्यवाद.

आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्या Newsletter ला इथे. Email Newsletter
आणि हे पत्र जर नियमित व्हाट्सऍप वर मिळावे असं वाटतं असेल तर ही आहे आमची व्हाट्सऍप कम्युनिटी लिंक इथे.WhatsApp Community

Reader, एक सांगायचं होतं....

हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.

आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.

माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.

तुमचा मित्र,

अजिंक्य कवठेकर

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page