We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!
। । श्री । । सप्रेम नमस्कार विनंती विशेष, हा लेख तुम्हाला मिळणार तेंव्हा दसरा झालेला असेल त्यामुळे "लेट पण थेट" दसऱ्याच्या माझाव्यापार कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ह्या जगात काही तरी चांगले बदल घडवून आणण्यासाठी तुमच्या मनात जे काही विचार असतील त्या सगळ्या विचारांचा विजय व्हावा आणि ते चांगलं काम थांबवण्यासाठी जे काही वाईट विचार काम करतील ते सगळे कालच्या रावण दहनात जळून गेले असा विचार करा आणि माझाव्यापारच्या शुभेच्छा ह्या पत्रातून मिळाल्या आहेत असं समजा. आधीच्या काळात पत्र मिळायचं की लोकं असेच खुश होतं होते आणि आज काळ फोन उचलायचा कंटाळा करतात. आजचं पत्र काय लिहावं ह्या विचारात मी असताना मला रतन टाटा ह्यांच्या बद्दलची दुःखद बातमी समजली आणि माझ्या मनात फक्त एकच श्लोक आला. हा श्लोक रतन टाटांनी खरा जगला आहे असं मला वाटलं. देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेची क्रिया धरावी । मना चंदनाचे परी त्वां झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे || ।। श्री राम ।। अगदी खरं आहे. देह राहिला नाही पण रतन टाटा प्रत्येकाच्या लक्षात राहणार. आपला देह टाकला तरी कीर्ती तशीच राहिली पाहिजे अशी आपली क्रिया असावी हे समर्थ रामदास आपल्याला सांगत आहेत जे रतन टाटांनी करून दाखवलं. रतनजींसारखे व्यक्ती भारतात पुन्हा पुन्हा जन्माला यावे आणि त्यांच्या वागणुकीतून आपण शिकून तशीच क्रिया करावी इतकीच माझी इच्छा आहे. माझाव्यापार टीम कडून रतन टाटा ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मला ऐकणं का महत्वाचं वाटत?असं ऐकावं सगळ्यांनी रतन टाटांच्या या ४ शिकवण आपल्या आयुष्यात वापरा आणि उद्योगपती बना वगैरे असले काही पॉईंट्स मी लिहिणार नाही. इंटरनेट वर प्रत्येक दुसरी शिकवण ही याच ठरलेल्या ४-५ उद्योगपतींची असते. त्यांनी खरंच तसं कुठे लिहून ठेवलं किंवा म्हणलं आहे का माहित नाही पण असे Quotes खूप सापडतात. पण खरं सांगू का रतन टाटा किंवा अजून कोणी ह्यांच्या ५ शिकवणं ह्यात वेळ घालवण्या पेक्षा त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचली किंवा त्यांचे इंटरव्हियू शोधून वाचावे किंवा ऐकावे. आपण सगळ्यांनी "वेल रेड" किंवा "बहुश्रुत" असे दोन शब्द नक्की ऐकले असतील. आपल्या संस्कृतीत सहसा बहुश्रुत व्यक्ती आहे असं म्हणतात. ज्याचा अर्थ होतो की ज्याने भरपूर लोकांचे चांगले चांगले विचार ऐकलेले आहेत आणि जवळपास सारख्या अर्थाचा शब्द आहे "वेल रेड" म्हणजे ज्याने भरपूर लोकांचे चांगले विचार वाचले आहेत असा पण आहे. इतकं काय महत्वाचं आहे हे ऐकणं?तुझं का ऐकावं हे आधी ऐकू दे! आता हेच ऐकण्याचं महत्व सांगणारी एक गोष्ट देवी भागवतात सुद्धा येते. मधू आणि कैटप हे दोन राक्षस, ह्यांचा जन्म भगवान विष्णूंच्या कानाच्या मळातून झाला असा उल्लेख देवी भागवतात येतो. मी जेंव्हा पहिल्यांदा ही गोष्ट ऐकली होती मला जो लिहिलेला अर्थ आहे तोच समजला होता. पण गंमत बघा त्याचा अर्थ किती मोठा आणि छान आहे. राक्षस ही एक प्रवृत्ती आहे जी आपण जेंव्हा चुकीचं ऐकतो आणि वाचतो त्या मधून जन्माला येतं असते. त्यामुळे चांगलं ऐका हा एक संकेत ही गोष्ट आपल्याला देऊन जाते. म्हणून मोठे आपल्याला, "ऐकत जा रे" म्हणतात वाटत!काय खरं लिहिलं आहे ना या GIF मधे. एक वेळ पोटात गडबड झाली तर बरं होईल काही दिवसात पण डोक्यामधे झाली तर? डोक्यांचे आजार वाटतात तितके सोप्पे नसतात. म्हणून मी आज ऐकण्याबद्दल लिहिण्याचा विचार केला. इतकं कन्टेन्ट आहे इंटरनेट वर त्या पैकी फक्त आनंद देणारं, बघून हसू येईल, मज्जा येईल असं कन्टेन्ट बघण्यापेक्षा थोडा विचार करा नेमकं माझ्यासाठी चांगलं कुठलं आणि मग तेच डोक्यात जाऊ द्या. आता मी चांगलं ऐका, ऐकणं असं ऐकणं तसं वगैरे सांगितलं पण इंटरनेट वर काय माझ्या मते चांगलं ऐकण्यासारखं आहे ते सांगतो. वाल्मिकी रामायण समजून घ्या हिंदी किंवा इंग्लिश मधे सोबत मस्त ऍनिमेशन पण बघा. आठवड्याभराच्या न्यूज रविवारी ३० मिनिटात हसत हसत ऐका. Learn Spirituality and life growth with Mahatria. आपल्या देवी देवतांच्या आरत्या, श्लोक, उत्सव ह्या बद्दलची माहिती मराठीमधे समजून घ्या. असेच अजून चांगले विचार असणारे कन्टेन्ट कुठे मिळतात हे तुम्हाला माहिती असेल तर मला रिप्लाय मधे नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या पत्रात अजून एका नवीन विषयासोबत. तो पर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त रहा. या पत्रात खुपदाचं ऐका-ऐका म्हणालो असेल तरअसले रणबीर सारखे रिप्लाय देऊ नका.
आता आमचे ह्या आठवड्याचे स्पॉन्सर्स काय म्हणतात बघूया.
|
We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!