We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!
। । श्री । । Reader सप्रेम नमस्कार विनंती विशेष, स्वतः तुम्ही आमच्या वेबसाईट वर जाऊन कधीही हे सगळे पत्र वाचू शकतात पण प्रत्येक आठवड्यात होणाऱ्या काही खास घडामोडी आणि त्या वाचत वाचत प्रत्येक रविवारी स्वतः थोडं काहीतरी नवीन शिकणे हे जितकं छान आहे ना तितकी मजा "एक दिवशी बसून सगळं वाचून काढलं" ह्यात नाही. माझा सप्रेम नमस्कार अनुभव आहे घाबरगुंडी उडाल्याचाहा अनुभव आहे रक्त-दानाचा. मी दवाखाना, ऑपरेशन, औषध, सर्जरी ह्या सगळ्या शब्दांपासून आणि ह्या शब्दांच्या सोबतीची जितके शब्द आहेत त्या सगळ्यांपासून शक्य तितका दूर राहाणारा व्यक्ती आहे. भीती कधी बसली मला माहित नाही. मी त्या भीती वर काम करून आता बराच धीट झालो आहे. आधी इंजेकशन पाहिलंच की मी उडी मारून पळत होतो. तसा मी आता नाही, पण भीती आहेच. कोण घाबरलं आहे? मी? आणि मग तो दिवस आला पण एक दिवस असा आला जेंव्हा मी त्याला नाही म्हणू शकलो नाही. सगळेच कारण संपले होते. तो मला जबरदस्ती त्याच्या गाडीवर मागे बसवून घेऊन गेला. तो स्वतः रक्त दान करायला इतकाच उत्सुक होता जसा कुठल्या बागेत गेल्यावर एखादं लहान मुलं होतं. मला मात्र तिथे गेल्या गेल्या माझ्या अत्यंत आवडीचा आणि ज्या मुळे भीतीची सुरवात होते तो वास नाकात गेला स्पिरिट चा. तो गेला त्या बेड वर जाऊन झोपला आणि सुरूही झालं ब्लड काढणं. मी आता काय कारण सांगू, काय कारण सांगून पळू, हाच विचार करत होतो. "मला जरा एक दोन गोष्टी चेक करू दे मग आपण करू रक्त दान. काय ब्लड ग्रुप काय तुमचा?"मी म्हणालो "ओ" "अरे वा! युनिवर्सल डोनर तुम्ही आणि तुम्हीच घाबरलं तर कसं जमेल?" मी असाच ओरडलो असतो त्या दिवशीजर सुई टोचली असती तर! परिस्थिती घडवते मनस्थितीपण म्हणतात ना अनुभव माणसाला सगळं काही शिकवतो. मागच्या काही वर्षात दवाखाना मला खूप जवळून बघावा लागला. नातेवाईक म्हणा मित्र म्हणा, ह्या सगळ्यांसाठी मला ज्या गोष्टीची भीती होती ती गोष्ट माझ्या शिवाय कोणी करूच शकणार नाही अश्या वेळी माझ्या समोर पुन्हा पुन्हा आली. आणि मग कसली भीती आणि कसलं काय! मला ब्लड डोनेट करणे हे किती महत्वाचं आहे हे लक्षात आलं. त्यात मी "ओ पॉझिटिव्ह" आणि मीच घाबरून कसं जमेल? असाच गेलो होतो मी तिथे!
|
आपल्या मनाला असं निवांत रहाणं आवडतं बघा!
आपल्या मनाच एकच काम आहे की ते स्वतः आणि आपण कायम सुखरूप आणि निवांत असावं. मनाला कष्ट, त्रास सहनच होतं नाही. पण गणित बघा कसं आहे त्रास, कष्ट घेतल्या शिवाय काही मिळतही नाही.
कष्ट नको तर मस्त आयुष्य नाही, मस्त आयुष्य पाहिजे तर खूप कष्ट घ्या.
माझी खूप इच्छा आहे मी खूप जास्त फिट असावं. पण त्यासाठी घ्यावे लागतील कष्ट आणि त्रास. कोणते कष्ट आणि कोणते त्रास? उदाहरण सांगतो, सकाळी उठावं लागेल (झाले मनाला कष्ट), जे शरीराला चांगलं नाही ते खाणं बंद करावं लागेल (झाला त्रास), व्यायाम करावा लागेल (हे तर खूपच कष्ट झाले), वेळेवर झोपावं आणि उठावं लागेल (अरे देवा कितीरे त्रास)
हे सगळं करून त्रास देण्यापेक्षा मन म्हणतं, "सोड ना! काय फरक पडतो फिट नसेल तर. तसं पण चाळीशी नंतर काही ना काही त्रास सुरु होणारचं आहे. सध्या एन्जॉय करू. नंतरच नंतर बघू. कोण ते सकाळी उठणार. व्यायाम करणार. हे सगळं केलं तर किती रे कष्ट होतील. त्या पेक्षा झोप ९ पर्यंत. तू काम करून दमला आहेस."
खरं सांगा. बोलतं ना मन कधी कधी असं? तर मी रक्त दान फक्त माझ्या मनाला उत्तर देण्यासाठी नाही, तर एक सणसणीत कानाखाली देण्यासाठी केलं. त्या रक्तामुळे ज्या कोणाला फायदा होणार असेल तो चांगलाच आहे पण मला इतकाच फायदा झाला आहे काय सांगू तुम्हाला. परवा पासून माझ्या मनाने मला शहाणपणा शिकवणं थोडं कमी केलं आहे. उगीच घबरावतं होतं रावं. इतकं काही अवघड नाही रक्त दान.
तुम्ही सांगा. तुम्हाला जेंव्हा मन घाबरवतं, काही काम करण्यापेक्षा आळशी बन, झोपून रहा, आराम कर, निवांत रहा अश्या काही सूचना देतं तेंव्हा त्याचं ऐकावं वाटतं का मी दिली तशी एक सणसणीत कानाखाली मारावी वाटते? कधी लावली असेल आपल्या मनाच्या कानाखाली तर मला नक्की कळवा.
मन कायम आळशी बन हे सांगेल पण तुम्ही त्याच्या कानाखाली मारून स्वतः Discipline मधे रहा.
भेटूया पुढच्या पत्रात. माझं पुढचं पत्र येईपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या कामात व्यस्थ रहा. धन्यवाद.
आणि हो रक्त दान नक्की करा. छान वाटतं.
रामायण अभ्यासाला घेतलं तर आयुष्य पुरत नाही असे म्हणतात. आपल्याला अभ्यास करायचा नसेल. फक्त वाल्मिकीजींनी लिहिलेले रामायण आपल्याला माहित असावं इतकीच आपली इच्छा असेल तर पुढे नक्की वाचा.
YouTube वर एक चॅनेल आहे ज्याचं नाव आहे 21Notes. ह्या चॅनेलच्या माहिती मधे ते लिहितात आम्ही ह्या चॅनेल वर वाल्मिकी रामायण सांगतो ते पण एकविसाव्या शतकातल्या लोकांसाठी. ह्या चॅनेल मधल्या व्हिडिओ मधे वाल्मिकी रामायणातले महत्वाचे श्लोक आपल्याला बोलून दाखवले जातात त्याच बरोबर मागे एक ऍनिमेशन द्वारे रामायणाची गोष्ट दाखवली जाते आणि मधे मधे काही प्रश्न पण विचारून त्यांचे उत्तरं दिले जातात. आणि कुठलाही व्हिडिओ हा १० मिनिटांच्या वर नाही त्यामुळे जर कोणाला सवय नसेल मोठे व्हिडिओ बघण्याची तर तो सुद्धा एक बघण्यात गुंग होतो. पुन्हा ह्या रामायणातले संस्कृत श्लोक आपल्याला स्क्रीन वर दिसतात आणि त्याचे अर्थ हे इंग्लिश आणि हिंदी अश्या दोन्ही भाषेमधे उपलबद्ध आहेत.
वाल्मिकी रामायणाची सोप्या भाषेत, नवीन पिढीला आवडेल अश्या पद्धतीने ओळख करून घ्यायची असेल तर हे चॅनेल नक्की बघा. छान प्लेलिस्ट आहेत प्रत्येक प्रसंगाच्या आणि सोप्या भाषेत समजून सांगितलं आहे.
तर 21Notes हे YouTube चॅनेल नक्की बघा. अश्याच प्रकारचे अजून चॅनेल तुम्हाला माहित असतील तर मला नक्की कळवा. तुमच्या मनामधे काही क्रिएटिव्ह पद्धतीने आपले ग्रंथ मांडण्याची इच्छा असेल तर तसेही मला कळवा. मी जे लिहिलं आहे त्या बद्दलचे आपले मत दिले तर मला खूप आवडेल. भेटूया पुढच्या पत्रात रविवारी ९.०० वाजता.
आमचे newsletter जॉईन करायचे असेल तर ही आहे लिंक : Join Mazavyapar's Newsletter
Reader, एक सांगायचं होतं.... हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो. आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना. माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही. तुमचा मित्र, अजिंक्य कवठेकर |
We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!