We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!
।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, आपल्या एकापेक्षा एक चांगल्या प्रतिक्रिया वाचून मी पुन्हा आलो आहे, रविवारी गप्पा मारण्यासाठी. आपल्या छान प्रतिक्रियांवरून मला असं समजतं आहे की मला समजावून सांगता येतं. तसं खरं असेल तर चांगलंच आहे. तुम्ही वाचत रहा आणि मला प्रतिक्रिया देत रहा. आपण सगळे वेळात वेळ काढून माझे पत्र वाचतात आणि त्याला चांगल्या प्रतिक्रिया देतात म्हणून सगळं शक्य होतं आहे. आज पण पुन्हा एकदा भेटूया समर्थ रामदासांना एका गोष्टीमधून. लेट्स गो!
सुरवात करूया एका मात कथेने!आज मी जी कथा सांगणार आहे ती एक मात कथा आहे. मात म्हणजे मानलेली. कुठेतरी काहीतरी बोध, काही तात्पर्य सांगायचं असतं म्हणून खूपदा कथेमधे वाढवून-चढवून सांगितलं जातं. पण लक्ष नेहमी बोधाकडे असावं. तो प्रसंग, तो विनोद (जोक), हे वेगळ्या पद्धतीने पटवून देण्यासाठी, वाचण्याऱ्यांच्या लक्षात बसावं म्हणून वाढवून सांगितलेला असतो हे कधीही विसरू नये.
या कथेमधे एक गणपती बाप्पांचा भक्त होता. त्याचं रोजचं एक काम ठरलेलं होतं. सकाळी ऑफिसला जाण्याच्या आधी गणपती मंदिरात जायचं आणि गणपती बाप्पानां माझी लॉटरी लागावी म्हणून प्रार्थना करायची. आणि तो हे अगदी न चुकता नियमितपणे करायचा. एक दिवस चुकला नाही, का वेळ चुकली नाही. रोज त्याचं वेळेला मंदिरात येणार तीच प्रार्थना करणार आणि कामाला जाणारं हे ठरलेलं होतं. हा नित्य-नेम १ वर्ष पूर्णपणे पार पडला. लॉटरी काही लागली नाही. पण गणपती बाप्पांवर खूप श्रद्धा. त्याने परत एक वर्ष तोच नेम कायम ठेवला. पण तरीही काही झालं नाही. तरीही तो थांबला नाही. हाच नेम त्याने ५ वर्ष, ८ वर्ष, १५ वर्ष असा करत करत २५ वर्ष कायम ठेवला. आणि आता तो क्षण आला. त्या दिवशी त्याने नेहमीप्रमाणे प्रार्थना केली आणि आज गणपती बाप्पांचा मूर्ती मधून आवाज आला. गणपती बाप्पा म्हणाले, "बाळा गेले पंचवीस वर्ष तू मला रोज त्याचं वेळेवर भेटतो आहेस. मी खूप खुश आहे तुझ्यावर. आज मी पूर्ण ठरवलं होतं की तुला लॉटरीच तिकिट मिळवून द्यायचं. पण बाळा लॉटरीच तिकिट विकत तर घे!" जो स्वतःची मदत करतो, त्याला देव मदत करतात.स्वतः आपलं ध्येय गाठण्यासाठी आपण मेहनत करतो आहोत का? का कमी काम करून पाहिजे तसा रिझल्ट मिळाला नाही की सगळं देवाच्या नावावर ढकलून देण्याची सवय लागली आहे आपल्याला? माझ्या मते आपल्याला एखादं काम मिळालं आहे, हे समजलचं की देवाचा आशीर्वाद मिळाला समजा आणि मेहनत सुरु ठेवा. पण आळस नावाचा जो कोणी आहे तो नाही करू देतं तसं. भरतीला सध्या आपण इन्फॉरमेशन वाले लोकं झालो आहोत. अगदी बोटावर माहिती असते आपल्या कडे. त्या मुळे बरेचदा आपला असा समज होतो की मला तर सगळं माहिती. पण ते नुसतं माहिती आहे. जो पर्यंत आपण ते क्रियेद्वारे करत नाही तो पर्यंत ते समजलं असं न म्हणलेले बरं. क्रियेद्वारे म्हणजे सुद्धा एकदा दोनदा नाही, बरेच वर्ष. मी एका इंग्लिश लेखकाचं पुस्तकं वाचलं डेल कार्निगी ह्यांचं. त्याच्या मधे मी ही लाईन वाचली, "Doing is Learning" म्हणजे "एखादी गोष्ट करणे म्हणजेच शिकणे आहे." ही लाईन मला इतकी आवडली आम्ही सगळ्यांनी मिळून ही लाईन म्हणजे माझाव्यापारची टॅग लाईन ठरवली. (माझाव्यापार म्हणजे आमची ऑनलाईन कम्युनिटी जिथे आम्ही इंटरनेट चा वापर काही तरी क्रिएट करायला करतो, वेळ घालवायला नाही.) Doing is Learning समर्थ कसे शिकवतात बघूया!मनाचे श्लोक ऐकता ऐकता एक ओळ माझ्या कानावर पडली आणि मला असं जाणवलं की समर्थ रामदास मला doing is learning समजावून सांगत आहेत. फुकाचे मुखी बोलता काय वेचे । दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ॥ क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे । विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे || समजूनच घ्यायचं असेल तर ह्या श्लोकाचा अर्थ फार खोल आहे. पण आपण या श्लोकामधली एक ओळ बघू. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे कारण आजचं पत्र त्याचं बद्दल आहे. Doing is Learning!मला हा विषय का घ्यावा वाटला माहिती का? आपण आज सोशल मीडियाच्या जगात इतके टिप्स, ट्रिक्स, हॅक्स चे इतके व्हिडिओ बघतो पण स्क्रोल करता करता वेळ इतका निघून जातो की ते करून बघायला वेळचं मिळतं नाही. हे सगळे व्हिडिओ आपल्याला आपण सगळं शिकलो आहोत असा भास आणतात पण खरं तर आपण फक्त बघतो आहोत. स्क्रोल करत करत मन बिझी होऊन जातं पण हात नुसते बसलेले असतात ना.माहिती घेतल्या मुळे यश नसतं मिळतं ते वापरल्या मुले मिळत असतं. आपल्या सरकारने चेनाब नावाचा भारतातला सगळ्यात उंच जागेवर असलेला, सगळ्यात मोठा असा रेल्वेचा ब्रिज बांधला ही माहिती समजल्यावर आपण किती मोठ्या देशात रहातो, आपली चांगली प्रगती होतं आहे, मोठे स्वप्न बघितले पाहिजे, मी सुद्धा असं काहीतरी छान करेल हे सगळे विचार डोक्यात येऊन त्याच्यावर काम झालं पाहिजे. पण हे ना होता, बरेच जण (मी सगळे म्हणत नाहीये), बरेच जण हा व्हिडिओ स्टेटस ला ठेऊन आम्ही कसे मोठे आहोत, आमचे मोदीजी कसे मोठे आहेत, बेस्ट प्राईम मिनिस्टर एव्हर असे स्टेटस ठेवून झोपलेले असतात किंवा संध्याकाळची सिरीयल बघण्यात गुंग झालेले असतात.
ही AI ने बनवलेली खोटी image आहे. समर्थ हेच आपल्या मनाला समजावून सांगतात, "क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे रे मना. नुसतं स्टेटस ठेवल्या मुळे तू आपल्या देशात जे चांगलं होतं आहे त्याचा तर प्रचार करतो आहेस, पण इतकंच अपेक्षित नाही रे तुझ्या कडून. तुझा तूच शोधून पहा. तू हे स्टेटस ला ठेऊन त्याचा गर्व न करता, मोदीजींकडे बघून, त्यांच्या टीम कडे बघून काहीही करणं शक्य आहे हे समजून घे आणि कामाला लाग. क्रिया कर. फुकटचे बोलून-बोलून नुसता गर्व साचतो रे आपल्या मनात." असं प्रेमाने समजावून सांगतात. मला सांगायचं इतकंच आहे की ज्ञान हे फक्त सामर्थ्य आहे. त्याला तुम्ही सामर्थ्य असलेली शक्ती पण वापर न केली गेलेली शक्ती आहे असं समजा. ती शक्ती फक्त उपयोगात आणल्यावरचं खरी शक्तीशाली ठरते. आजच्या पत्रात आपण सगळे जण ठरवून घेऊ की क्रिया केल्या शिवाय मी बोलणारं नाही. माझ्या मधे जे काही potential (शक्ती) लपलेलं आहे ते मी शोधेल आणि रोज वापरात आणेल. मी शेवटी इतकचं सांगेल स्वस्थ रहा, मस्त रहा आणि क्रिया करण्यात व्यस्थ रहा. आमचे पत्र जर नियमित ई-मेल आर मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर आमच्या Newsletter ला Subscribe करा. 👉 Subscribe to our Newsletter हे पत्र ई-मेल नको व्हाट्सएप्प वर मिळाले तर जास्त बरं होईल असं वाटतं असेल तर आमची community जॉईन करा इथे. 👉 Join our Whatsapp Community |
We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!