profile

Thoughts become Things!

लिहिण्याच्या सवयीचे फायदेच फायदे!


। । श्री । ।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

आपलं स्वागत आहे एका नवीन पत्रात. प्रत्येक रविवारी सकाळी बरोबर ० ९ .० ० वाजता. मी म्हणालो होतो ना मागच्या पत्रात मी वेळेत पत्र पाठवेन म्हणून.
आजचा लेख म्हणजे मी जे प्रत्येकाला "रोज काहीतरी लिहा" असं सांगतो ना, त्याने काय होऊ शकते ह्याचं एक उदाहरणं आहे. ब्लॉग्स लिहिण्याचे काम सुरु करून मला २ वर्ष नक्कीच झाले आहेत. मी सुरवात तरी आपण पैसे कमवू म्हणून केली होती पण त्या मधे लागणारी मेहनत बघून आणि मी ब्लॉगिंग करायच्या आधीच बाकीच्या कामात स्वतःला गुंतवून ठेवलेले असल्या मुळे मी ठरवलं की आपल्याला लिहायची आवड आहे ती हळू हळू डेव्हलप होतं रहावी म्हणून लिहू. जसं जसं माझं काम ज्या मधे मी सध्या बिझी आहे, ते सांभाळायला लोकं ट्रेन झाले की ब्लॉगिंग वर जोर देऊ. म्हणून मी दार रविवारी एक हे ठरवून ब्लॉग्स लिहिणं सुरु केलं.

तुम्ही जर माझ्या newsletter ला subscribe केलेले असेल तर माझे इमेल्स म्हणजेच ब्लॉग्स प्रत्येक रविवारी न चुकता येणार. तुम्ही जर subscribe केलं नसेल तर ही आहे लिंक Mazavyapar's Newsletter.

मागच्या पत्रात मी गणपती विसर्जनाबद्दल माझे काही विचार मांडले होते. ते वाचायचे राहिले असतील तर इथे क्लिक करून वाचू शकतात. आज बाप्पांचं विसर्जन. १० दिवस झाले?

आज मला काहीतरी खास सांगायचं आहे!

मला काल राधेश्याम एड्युसोशल फौंडेशन तर्फे एका वक्तृत्व स्पर्धेचे उदघाट्न करण्यासाठी बोलावलं गेलं. राधेश्याम मधल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार कारण वक्तृत्व हा माझ्या आवडीचा विषय त्याच विषयाची आवडं असलेल्या इतक्या सगळ्या लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना भेटण्याची संधी मला मिळाली.

मी जो काही संवाद साधला त्या मधे मी हेच सांगायचा प्रयत्न केला की, "ही स्पर्धा झाली, बक्षीस मिळालं की थांबू नका. आजपासून हे ठरवून घेऊया की मी माझे वक्तृत्व रोज थोडं थोडं छान करण्यावर काम करेल. अशी एक तरी सवय मी स्वतःला लावून घेईल."

आपल्या सवयी आपल्याला घडवतात हे मला एका शब्द कोड्यामधून समजलं!


माझे एक बिझनेस कोच आहेत. त्यांनी, मी जेंव्हा नवीन नवीन बिझनेस सुरु केला होता तेंव्हा हे शब्द कोडं मला विचारलं होतं.

Take me, Train me, Be firm with me and I will put the world at your feet.

Be easy with me and I will destroy you. Who am I?

Answer: My name is HABIT

तू मला तुझ्या सोबत घे, मला प्रशिक्षण दे, माझ्या सोबत कठोर रहा आणि मी हे जग तुझ्या पायांपाशी आणून ठेवेन.

पण जर तू मला हलक्यात घेतलं तर मी तुझा सर्वनाश करेन.

मी कोण आहे ओळख?

उत्तर: माझं नाव आहे सवय.

ते मला म्हणालेले मला अगदी स्पष्ट आठवतं आहे. "अजिंक्य तू चांगल्या सवयी घडव त्या तुझं आयुष्य घडवतात आणि तू वाईट सवयी लावून घे, किती पण उंची वर गेलेला असशील ना त्या तुला जोरात जमिनीवर आपटतात."
त्या दिवशी पासून मला, मी जे काही करतो ते सवयींमधे बसवणायची सवय लागली. आता ही लिहिण्याची सवय घ्या. मी आवड आहे म्हणून १-२ महिने लिहून, लिहिणं बंद करू शकलो असतो पण तसं न करता मी एक वार ठरवला आणि त्या दिवशी मी काहीतरी चांगलं वाचण्यासारखं लिहून सेंड करणारं हे जाहीर करून टाकलं. आता जाहीर केल्यामुळे माझा शब्द मालाच पाळावा लागणार हे माझ्या मनाला चांगलंच समजलं. आणि ही लिहिण्याची आवड पुढे चांगलं बोलण्यामध्ये सुद्धा कधी गेली मलाही समजलं नाही.


लिहायचं म्हणलं ना की वाचावं लागतं. जे वाचलं त्या बद्दल लिहायचं असेल तर त्या वर चिंतन, मनन करून आपल्याला समजलेले, आवडलेले मुद्दे वेगळे करावे लागतात. म्हणजे एका "मी काहीतरी लिहिणार" ह्या सवयीमध्ये किती गोष्टी आपल्या बघा ना. वाचणे, चिंतन, मनन. बार आपलं लिहिलेलं कोणी वाचून त्या बद्दलची प्रतिक्रिया दिली तर त्या वर चर्चा होऊन नवीन भेटणारे मित्र ते वेगळेच. मी म्हणालो ना. फक्त फायदे दिसतील लिहायला सुरवात केली तर.

लिहिण्यामुळे संधी कश्या मिळतात बघा!

राधेश्याम फौंडेशन मधल्या प्रत्येक व्यक्तीला मी ओळखतोच असं नाही. हळू-हळू माझ्या ओळखी होतं आहेत. पण मी लिहिलेले हे लेख त्या संघातले बरेच जणं वाचतात आणि कळत किंवा न कळत माझी प्रत्येका सोबत ओळख होते. हाच तर खरा लिहिण्याचा फायदा आहे. मी काय म्हणालो पुन्हा एकदा वाचा. माझी ओळख माझ्या लिहिण्यामुळे होते, माझ्या न कळत. हे अजून एक कारण "का लिहावं?".

तर तुम्ही सुद्धा हा लेख वाचल्या नंतर कुठलीतरी एक चांगली सवय मी स्वतःला लावून घेईल हे ठरवा आणि तसेच वागा. प्रत्येक आठवड्याला लिहिण्याची सवय लावून घेण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो. पण एक तरी चांगली सवय नेहिमी साठी लावून घ्या. अशी सवय ज्या मुळे लोकं तुम्हाला ओळखतील.
मला पुढच्या आठवड्या पर्यंत मी तिथे जे ५ मिनिटं बोललो ना त्याचा व्हिडिओ मिळेल मी नक्की तुमच्या सोबत शेअर करेन. आजच्या पत्रात इतकंच. पुढच्या पत्रात मला काही फ्री मधे आणि बिझनेस करणाऱ्या किंवा पर्सनल ब्रँड चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कामाला येतील असे काही टूल्स सांगायचे आहेत. पुढच्या पत्रात डिटेल बोलूयात.

राधेश्याम एड्युसोशल फौंडेशन चे खूप खूप आभार आणि त्यांच्या पुढच्या सगळ्या कार्यक्रमात मला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सहभाग घ्यायला खूप आवडेल.

टेकनॉलॉजीचा चांगलाही वापर होतो!

आपल्या पैकी बऱ्याच जणांनी Canva नावाचं एक सॉफ्टवेअर मोबाईल मधे किंवा कॅम्पुटर वर नक्की वापरलं असेल. खूप छान सॉफ्टवेअर आहे. प्रत्येक सणांना, काही महत्वांच्या दिवसांना, कोणाच्या वाढदिवसाला जर सोशल मीडिया वर पोस्ट करण्यासाठी पोस्टर बनवायचे असेल तर Canva मधे सोप्या पद्धतीने बनवता येत. पण हे सॉफ्टवेअर फ्री नाही. काही प्रमाणात फ्री आहे आणि काही प्रमाणात पैसे द्यावे लागतात.

आज तुम्हाला एक वेबसाईट सांगतो जिथे जे जे काम Canva मधे करता येतं ते सगळं आपण करू शकतो ते पण फुकटात. हा जो सेगमेंट आहे आमचा त्या मधे माझं हेच काम आहे की इंटरनेट वर फुकट उपलबध्द असेल टूल्स आपल्याला माहिती पाहिजे आणि वापरता आले पाहिजे. Canva चे सगळे कामं फुकटात करून देणाऱ्या सॉफ्टवेअर च नाव आहे. studio.polotno.com


असेच अजून फ्री टूल्स जाणून घेण्याची इच्छा असेल तर आमचे Newsletter नक्की जॉईन करा: Mazavyapar's Newsletter


माझाव्यापार गोल्ड मेम्बरशीप म्हणजे नेमकं काय?

तुम्ही आमच्या बऱ्याच ब्लॉग्स मध्ये गोल्ड मेम्बरशीपचा उल्लेख झालेला पाहिला असेल. तर हे नेमकं काय प्रकरणं आहे? माझाव्यापार हा एक उद्योजकांचा समूह आहे जिथे सगळे जण आपलं आपलं काम करत इतकारांना मदत करण्याचा प्रयत्न करतात.

आम्ही सगळे वेगवेगळ्या बिझनेस मध्ये आहोत पण आमच्या मधल्या दोन गोष्टी सारख्या आहेत.

१. बिझनेसची भरपूर पुस्तकं सोबत वाचणे आणि चर्चा करणे.

२. आपल्या चुकांमधून शिकलेले अनुभव योग्य व्यक्तीला सांगणे.

गोल्ड मेम्बरशीप मध्ये आम्ही महिन्याला एकदा झूम मिटिंग द्वारे आमच्या सगळ्या मेंबर्स सोबत गप्पा मारतो आणि त्याच सोबत त्यांना ऑनलाईन फुकट उपलब्ध असलेल्या वेबसाईट किंवा टूल्स वापरून कसा बिझनेस किंवा मार्केटींग करता येऊ शकते हे पण शिकवतो. आमचा उद्देश हा उद्योजक बनण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला बिझनेस आणि मार्केटींग शिकवण्याचा आहे.

तुम्हाला गोल्ड मेंबर मध्ये येण्याची इच्छा असल्यास तुम्ही आम्हाला ajinkya@mazavyapar.com इथे ई-मेल करू शकतात. माझाव्यापारची टीम लवकरचं तुमच्या सोबत संपर्क करेल.​


Reader, एक सांगायचं होतं....

हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.

आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.

माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.

तुमचा मित्र,

अजिंक्य कवठेकर

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page