profile

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

रॅप सॉंग म्हणजे नक्की काय?

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तर आला आहे रविवार आणि मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही माझ्या पत्राची वाट बघत आहात. क्रिकेट असेल, टीव्ही सिरीयल असेल किंवा बातम्या सगळे जणं कशी वाट बघत बसतात त्या त्या गोष्टीची वेळ झाली की तसंच काहीतरी माझ्या पत्रांसोबत व्हावं ही माझी इच्छा आहे. होईल हळू हळू. आत्ता तर कुठे सुरवात झाली आहे. वर्षोनुवर्षे हे पत्र येतं रहाणार हे नक्की. आज नवीन वर्षात आपण बोलूया एका विषयावर तो म्हणजे संगीत. मला का संगीत हा विषय घ्यावा वाटलं सांगू का? कारण मागच्याच महिन्यात...

आपणं कोणाचं ऐकत नसतो!

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तर आजचं पत्र आपण सुरु करूया एका खास आणि कमाल व्यक्तीचे अभिनंदन करून. गुकेश डोम्माराजू म्हणजेच भारताचा सगळ्यात कमी वयाचा चेस चॅम्पियन. हा मुलगा फक्त १८ वर्षाचा आहे. त्याचं वय सांगणं मला का महत्वाचं वाटतं माहिती का कारण आपण कधीही काहीही ठरवलं आणि त्याच्यावर रोज काम करत गेलो तर ते आपल्याला मिळतं हा जगाचा नियम आहे. पण आपल्याला काय मिळवायचं आहे हे समजे समजे पर्यंत लोकं म्हातारे होतात. खूप जणांना म्हातारं होई पर्यंत सुद्धा माहित नसतं. गुकेश जिंकल्या नंतरचे...

आणि या वर्षीचा नवीन शब्द आहे..........

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, स्वागत आहे पुन्हा एका नवीन पत्रात आणि आजच्या पत्रात आपण बोलणार आहोत भाषेबद्दल. असं म्हणलं जातं की जगात ७००० पेक्षा जास्त भाषा आहेत. बरं या ७००० मधे एकाच भाषेच्या ज्या वेगवेगळ्या बोली असतात त्यांचा समावेश नाही. म्हणजे कितीतरी भाषा आपण निर्माण केल्या ही कमालच आहे. आता या सगळ्या भाषांमधे इंग्लिश एक गरीब पण भाग्यवान भाषा आहे. गरीब का म्हणावं तर पहिले इंग्लिश ही माझी मातृ भाषा नाही आणि दुसरं म्हणजे खूप सारे इंग्लिश मधे असे शब्द आहेत जे लिहले वेगळे जातात आणि...

Are you a DOS Game lover?

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, स्वागत आहे एका नव्या पत्रात आज माझ्याकडे बोलण्यासारखं (म्हणजे मी लिहिण्यासारखं आणि तुम्ही वाचण्यासारखं) भरपूर काही आहे. प्रश्न असा आहे की हे सगळं मी एका पत्रात कसं बसवू? मी हे माझे पत्र म्हणजे ई-मेल न्यूजलेटर, आठवड्याला लिहितो आणि सात दिवसांमधल्या माझ्या सोबतच्या घडामोडी, काही चांगल्या गोष्टी, काही वाईट, पण ज्या मधून मी चांगलंच घेतो अश्या काही गोष्टी लिहून काढतो आणि मग काही जण ते वाचून मला रिप्लाय पण देतात. असा एक क्रम मागच्या काही वर्षांपासून बनला आहे....

तुम्ही कधी मनाला व्यायाम शाळेत पाठवलं आहे का?

। । श्री । । सप्रेम नमस्कार विनंती विशेष, आला आहे पुन्हा एक रविवार आणि काय लिहावं हा मोठ्ठा प्रश्न माझ्या समोर आहेच. रविवारी एक लेख लिहिणारा म्हणून मी माझी ओळख बऱ्याच जणांना करून देतो आणि लिहिला नाही ना तर माझा शब्द खरा करून दाखवण्याची संधी मी गमावून बसेल. बाकी कोणा साठी असो किंवा नसो मी माझ्या मनाला हे समजावं की “हा अजिंक्य आहे ना तो ठरवलं की केल्याशिवाय गप्प बसतं नाही” ह्या साठी लिहितं असतो आणि लिहितं रहाणार. आपलं विषेश स्वागत आहे आजच्या पत्रात कारण हे ते पत्र आहे जे लिहिण्याच्या आधी मला...

एक गोष्ट सांगू का?

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, आज मी लिहिलं आहे एक नवीन पत्र आणि हे पत्र तुमच्या पर्यंत कदाचित ई-मेल, ब्लॉगिंग वेबसाईट, व्हाट्सएप्प किंवा लिंकडीन ह्या पैकी एक पोस्टमन घेऊन आला असेल. आधीच्या काळात व्यक्ती घेऊन येतं होता पत्र पण आता इतकं सगळं डिजिटल झालं आहे की माहिती पोहचवणारा जो कोणी आहे त्याला पोस्टमन म्हणायला हरकत नाही. पत्र पोहचवणारा पोस्टमन हेच लॉजिक आहे तरहे कबुतर पण पोस्टमन आहे! हे पत्र मी आधी फक्त ई-मेल वापरून माझ्या काही ओळखीच्या लोकांना पाठवत होतो पण मागच्याच आठवड्यात मी...

Today let me share a Wonderful Short Film with you!

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, स्वागत आहे आपले माझाव्यापार च्या नवीन पत्रात. आज मी तुम्हाला एक छान अशी शॉर्ट फिल्म बघायला देणार आहे जी तशी तर खूप जुनी आहे पण आजही त्यामधून मिळणार मेसेज आजची तितकाच महत्वाचा आहे. ती शॉर्ट फिल्म कुठली आहे हे सांगायच्या आधी मी का ही शॉर्ट फिल्म शेअर करायची ठरवली ते सांगतो. जास्त वेळ घेणार नाही मी कारण शॉर्ट म्हणत म्हणत ती शॉर्ट फिल्म ३० मिनिटांची आहे. काही वर्षांपूर्वी ३० मिनिटं म्हणजे शॉर्ट च वाटायचं पण आता शॉर्ट्सच्या जगात जे ३० सेकंदांचे ही नसतात,...

उठा उठा दिवाळी आली!!!

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, हे पत्र तुम्हाला ज्या दिवशी मिळणार त्या दिवशी आहे भाऊबीज. तुम्हाला प्रत्येकाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या माझाव्यापार कडून खूप खूप शुभेच्छा. दिवाळी हा सणच असा काही आहे आपला की या दिवसात सगळेच्या सगळे खुश असतात. आणि इतक्या छान दिवशी माझाव्यापार म्हणजेच अजिंक्य ने लिहिलेलं पत्र मिळावं. वा..वा…काय छान योग म्हणावा. तर नेहिमीप्रमाणे जरा रिकॅप करूया “और अब आगे” असं म्हणून आजचं पत्र लिहितो. कारण माझे पत्र हे एपिसोड सारखेच आहेत. मागच्या...

मी रक्त या विषयावर लिहिलेल्या गोष्टीला रक्त चरित्र म्हणावं का?

। । श्री । । Reader सप्रेम नमस्कार विनंती विशेष, आमच्या नवीन पत्रात आपले स्वागत आहे. हे पत्र म्हणजेच एक ई-मेल Newsletter आहे आणि जर तुम्ही माझाव्यापार च्या ई-मेल लिस्ट मधे आहात तर असा एकही रविवार येणार नाही ज्या रविवारी सकाळी ०९.०० वाजता तुम्हाला हे पत्र म्हणजेच नव्या भाषेत ज्याला आपण ई-मेल म्हणतो तो येणार नाही. स्वतः तुम्ही आमच्या वेबसाईट वर जाऊन कधीही हे सगळे पत्र वाचू शकतात पण प्रत्येक आठवड्यात होणाऱ्या काही खास घडामोडी आणि त्या वाचत वाचत प्रत्येक रविवारी स्वतः थोडं काहीतरी नवीन शिकणे हे...

विज्ञानाने इलॉन मस्कला कडेवर घेऊन मारली उडी!

। । श्री । । सप्रेम नमस्कार विनंती विशेष, आमच्या नवीन पत्रात आपले स्वागत आहे. मागच्या पत्राला मला एकही रिप्लाय आला नाही म्हणून मी माझ्या ई-मेल च्या सेटिंग पहिल्या आणि माझ्या लक्षात आलं की एक गडबड झालेली आहे. त्यामुळे माझा ई-मेल तर तुम्हाला मिळाला पण त्याला जर तुम्ही रिप्लाय केला असेल तर तो मला मिळाला नाही. टेक्निकल एरर म्हणूया आणि माझ्या कडून क्षमस्व. कारण इतकी मेहनत घेऊन तुम्ही रिप्लाय कदाचित केला असेल आणि तो मधेच कुठेतरी हरवून गेला माझ्या पर्यंत आलाच नाही. झाली काही तरी चूक. पण आता रिप्लाय...

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!