profile

Thoughts become Things!

बिंज वॉच नाही बिंज रीड!


।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

रविवार आणि प्रत्येक वेळेस सारखा नवीन विषय. मागच्या आठवड्याचा विषय तर वेगळाच होता. शाळा आणि शिकण्याच्या पद्धती. पण तुमच्या सगळ्यांच्या मस्त प्रतिक्रिया मिळाल्या. या आठवड्यात खूप दिवसांच वाचायचं राहिलेलं एक पुस्तकं माझ्या समोर उद्या मारतं आलं. मी म्हणालो बरं सापडलं हे पुस्तकं. हे पुस्तक वाचू आणि ह्या आठवड्यात तेच थोडक्यात बोलू.

खूप जुनं आणि ठीक ठिकाणाहून तुटायला लागलेलं पण ते वेगवेगळ्या टेप वापरून चिटकवलेलं असं पुस्तक होतं. त्याला ज्या पद्धतीने चिटकवल्या गेलं होतं त्या वरून मी अंदाज केला की हे महत्वाचं पुस्तक दिसतं आहे. प्रकाशनाचा वर्ष पाहिलं तर ते होतं १९९४. एकतीस वर्ष जुनं पुस्तक. इतकं जपून ठेवलं आहे म्हणजे काहीतरी महत्वाचं असणारं. म्हणून मी पुस्तकाचं नाव वाचलं. नाव होतं "गीता प्रवचने" लेखक विनोबा.

हे पुस्तक माझ्या आजोबांनी वाचलेलं होतं, माझ्या बाबांनी आणि आता मी हातात घेतलं होतं. त्या रात्री ते पुस्तक माझ्या हातून काही खाली ठेवल्या गेलं नाही. अजून काय काय झालं बोलूया आजच्या पत्रात. लेट्स गो!

कधी पुस्तक बिंज रीड केलं का तुम्ही?

बिंज वॉच नावाचा एक प्रकार आपल्या कडे सध्या फार चर्चेत असतो आणि तो फार अभिमानाचा विषय असतो. मी अमुक एक वेब सिरीज बिंज वॉच केली म्हणजे रात्री बघायला बसलो किंवा आडवा पडून बघायला सुरवात केली आणि सकाळ पर्यंत मी सगळे एपिसोड्स बघूनच संपवून टाकले. ह्याच्यात अभिमान तर मला वाटतं नाही. वेळ वाया गेला हेच वाटतं. मी हे करून मग सांगतो आहे. मी पण बिंज वॉच केलं आहे.

असे डोळे होई पर्यंत मोबाईल बघणे म्हणजे बिंज वॉच करणे.

पण पुस्तक बिंज वॉच करावं वाटलं हा माझ्या आयुष्यातला पहिलाच अनुभव. पुस्तकं आहेच तसं. सुरवातीला मी वाचायला लागलो आणि मला समजलं की विनोबा हे दर रविवारी गीतेवर एक प्रवचन लिहायचे. हे वाचून मला आपण गीता नाही तर नाही पण रविवार ते रविवार लिहायला शिकलो इतका तरी आनंद झाला.

उदाहरणाने अवघड सोप्प वाटायला लागतं!

पण ह्या पुस्तका मधली विनोबांची प्रवचने इतकीच सोप्पी करून लिहिलेली आहे की लहान मुलालाही गीता समजेल. विनोबा आपल्याला हे समजावून सांगत आहेत की कर्म आणि ते कर्म करतानाची भावना दोन्ही सोबत असेल तर पाहिजे तो रिझल्ट मिळतो. आपली वापरामधली नोट आपण सहज कुठूनही प्रिंट करू शकतो. सारख्या आकाराची पण त्याच्यावर सरकारी शिक्का लागल्याशिवाय ती वापरता येतं नाही. ती खोटी म्हणली जाते. त्याचप्रमाणे कर्म हे नोटेप्रमाणे आहे. भावनेच्या शिक्क्याला किंमत आहे. कर्माच्या कापट्याला नाही. त्यांनी उदाहरणं इतकंच छान दिल आहे. मी जसं च्या तसं इथे खाली छापतो आहे. तुम्ही वाचून बघा.

गंगेवर दोन माणसें स्नानासाठी गेलीं आहेत अशी कल्पना करा. त्यातील एक जण म्हणतो, "गंगा गंगा म्हणजे काय? दोन भाग हायड्रोजन आणि एक भाग ऑक्सिजन असे दोन वायू एकत्र केले की झाली गंगा." दुसरा मनुष्य म्हणतो, "भगवान विष्णूच्या पदकमलातून ही निघाली, शंकराच्या जटाजूटात राहिली, हजारों ब्रह्मर्षींनी आणि राजर्षींनी हिच्या तीरावर तपश्चर्या केली, अनंत पुण्यकृत्यें हिच्या काठीं घडली; अशी ही पवित्र गंगामाई." या भावनेने ओला होऊन तो स्नान करतो. तो ऑक्सिजन-हायड्रोजनवालाही स्नान करतो. देहशुद्धीचे फळ दोघांना मिळालेच, परंतु त्या भक्ताला देहशुद्धीबरोबर चित्तशुद्धीचेही फळ मिळालें. गंगेत बैलालाहि देहशुद्धी मिळेल. अंगाची घाण जाईल. परंतु मनाची घाण कशी जाणार? एकाला देहशुद्धीचें तुच्छ फळ मिळालें, दुसऱ्याला हें फळ मिळून शिवाय चित्तशुद्धी अमोल फळ मिळालें.

इतक्या सोप्प्या पद्धतीने गीता मी नव्हती ऐकली!

भगवतगीता, रामायण, महाभारत, दासबोध, ज्ञानेश्वरी हे सगळे फार अवघड ग्रंथ वाटतात. मुळात आपण संस्कृत भाषे ऐवजी इंग्रजीला प्राधान्य दिलं. शाळेत हिंदी, संस्कृत ह्या सगळ्या Second Language घ्याव्या लागतात म्हणून घेतात सगळे. त्याचा परिणाम मराठी, हिंदी, संस्कृत अशा आपल्या भाषा आपण विसरलो आणि म्हणून आपले ग्रंथ अवघड वाटतात. समजून घेतले तर अवघड नाहीत. पण जरी अवघड आहेत तरी सुद्धा आपल्याकडे विनोबांसारखे थोर लोकं होऊन गेले ज्यांनी सोप्प्या भाषेत सगळी गीता समजावून सांगितली उदाहरणा सोबत.

अजून एक रोजच्या जगण्यामधलं उदाहरणं देऊन विनोबा सांगतात, "उपवास या शब्दाचा अर्थच मुळीं देवाजवळ बसणें. परमेश्वरा जवळ चित्त राहावें म्हणून बाहेरच्या भोगांना बंदी करायची. परंतु बाहेरचे भोग व्यर्ज करून मनात जर भगवंताचे चिंतन नसेल तर त्या बाह्य उपवासाला काय किंमत?'

हे एक तर आपल्याला माहिती नसतं. माहिती झाल्यावरही आपण काय करतो जे बाकी सगळे करतात. अरे उपवास म्हणजे लक्षमीनारायण फराळी चिवडा, साबुदाणा खिचडी, बटाट्याचे चिप्स (पाल्म तेलात तळलेले), केळाचे चिप्स तर फिक्स. उद्या उपवास म्हणजे हे सगळं घरात आलंच पाहिजे. पण ह्याच्यात भगवंताचे चिंतन करणे, भोग बंद करणे काहीच आलं नाही ना. मी उपवास करतो हा गर्व साठायला लागला तो वेगळाच.

शेवटी म्हणायचं काय आहे मला!

आपल्या हिंदू धर्मात फक्त क्रियेला महत्व नाही तर ती क्रिया करताना आपण काय भावनेने करतो ह्याला महत्व आहे. एखाद्याच्या वाढदिवसाला किती महागाचं गिफ्ट दिलं हे महत्वाचं नाही काय भावनेने दिलं हे जास्त महत्वाचं आहे. मला इतक्या हजारांचं त्याने दिलं होतं म्हणून मी पण देणार ही असली बरोबरी काही कामाची नाही. महागच गिफ्ट असून ते शून्य होतं हे डोक्यात राहू द्या म्हणजे झालं.

मी माझे पत्र अगदी मनापासून लिहितो आणि मी लिहिताना प्रत्येक वाचणाऱ्याला आठवून लिहितो. माझ्या काही पत्र वाचणाऱ्यांना मी पाहिलेलं ही नाही. पण तरीही मला ते दिसतातं. मी त्यांना प्रत्येक आठवड्यात रविवारी नक्की भेटेन असं सांगून काही माझ्या मनातले विचार सांगतो मग तुम्ही इतके मस्त रिप्लाय मला करतात. कधी कमेंट मधे तर कधी व्हाट्सएप्पच्या ग्रुप मधे तर कधी मनातल्या मनात. पण मला तुमचे उत्तरं मिळतात. लिहिताना भावना एकचं या निगेटिव्हिटी ने भरलेल्या जगात जे काही पॉझिटिव्ह आहे ते सांगणे आणि आपण खूप चांगले मित्र आहोत ह्याची रविवारी आठवण देणे.

असं मस्त वातावरण बनवा आणि वाचत बसा.

असेच आपण कर्म आणि भावना दोन्ही सांभाळत सांभाळत आपल्या सगळ्या कामात यशश्वी होतं राहूया. तुम्ही "गीता प्रवचने" हे पुस्तक नक्की वाचा. आपण भेटूया पुढच्या पत्रात एका नवीन विषयासोबत. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि गीता प्रवचने वाचण्यात व्यस्थ रहा. धन्यवाद.

गीता प्रवचने हे पुस्तक जर तुम्हाला amazon वरून विकत घ्यायचे असेल तर इथे क्लिक करा. Buy Geeta Pravachane by Vinoba Bhave.

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page