We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!
।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, मागच्या पत्राला कसल्या छान प्रतिक्रिया दिल्या तुम्ही सगळ्यांनी. खूप खूप धन्यवाद. मी म्हणालो ना गडबडीत लिहिलं की आवडतंच सगळ्यांना. शांत पणे लिहूच नये. असो. आजचा पण विषय आवडेल असं मला वाटतं. जर मागचं पत्र वाचायचं राहून गेलं असेल तर ही इथे आहे लिंक 👉 Monkey See, Monkey Do! असं म्हणतात की, "Best way to Learn anything is to Teach it." तुम्हाला जर काही शिकायचं आहे तर ते कोणाला तरी शिकवणं सुरु करा मग ते बरोबर शिकता येतं. तसे हे माझे पत्र आहेत. मला जर काही आवडलं मी ते बिनधास्त इथे लिहून टाकतो आणि माझ्या ओळखीच्या सगळ्यांना पाठवतो. मी मागच्या काही वर्षात सुरु केलेला आणि मला खूप जास्त आवडायला लागलेला एक विषय म्हणजे समर्थ रामदास स्वामी. मी वाचत वाचत निघालो आहे काय काय नाही लिहून ठेवलं आहे समर्थांनी इतकाच प्रश्न मला पडतो. तर आज मी एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट, त्या गोष्टीचं तात्पर्य समर्थ आपल्या कसं समजावून सांगतात ते बघूया. लेट्स गो......
शिकवणं काय मिळाली पाहिजे?गोष्टींमधून बोध देणे ही आपली फार जुनी संस्कृती आहे. त्याचं एक उदाहरणं सांगतो. कोणाला जर "लोकांचं ऐकू नको, स्वतःवर लक्ष दे, लोकं बोलतच असतात, आपलं लक्ष आपल्या कामावर पाहिजे, प्रवाहाच्या विरुद्ध काही करायला निघाला की लोकं हसणारच, पण तू थांबू नको, प्रयत्न करतं रहा." हे सांगायचं असेल तर मी पुढे जी गोष्ट आहे ना पंचतंत्रा मधली ती सांगावी. ती गोष्ट आहे बहिऱ्या बेडकाची. बहिऱ्या बेडकाची गोष्टएक छोटं डबकं होतं. त्या डबक्या मधे १५-२० बेडूक आणि बेडकी रहात होती. डबकं तसं खोल होतं. उडी मारून डबक्याच्या बाहेर येणं हे काही प्रत्येकाला शक्य नसायचं. जो मोठा बेडूक उडी मारून बाहेर येऊ शकायचा तो रोज बाहेर येऊन बाकी बेडकांना, "तुमचा पैकी कोण प्रयत्न करून बाहेर येऊ शकतं?" हा प्रश्न करायचा. ही स्पर्धा रोज चालायची. पहिला बेडूक बाहेर आला की हळू हळू ५-६ बेडकी बाहेर येऊ शकायची. आता बाहेर आल्यावर ते एकचं काम करायचे जो कोणी उडी मारून बाहेर येण्याच्या प्रयत्न करतो आहे त्याच्यावर हसायचे आणि त्याला नावं ठेवायचे. "अरे तुला काय जमणार आहे. तो बघ पडला पडला. काय म्हणालो होतो मी. हे बघ हा आला बुटक्या. हा तर उडी मारायच्या आधीच आऊट आहे. अरे ती बघ मोटी आली. अरे तू काय येती बाहेर. बस मधेच. प्रयत्न पण करू नको." त्यांचं काम एकचं होतं असं बोलायचं की मन खचून बाकी बेडकांनी प्रयत्न करणं सोडून दिलं पाहिजे. हे सगळं ऐकून बाकीचे बेडूक जी काही उडी मारण्याचा प्रयत्न करायचे ते पण करू शकतं नव्हते.
एक दिवस एक छोटा बेडूक आला आणि म्हणाला मी प्रयत्न करतो. नेहमीप्रमाणे जशी त्याने उडी मरायला सुरवात केली सगळे वर चढलेले बेडूक जोर जोरात हसायला लागले. त्याने एकदा प्रयत्न केला एक शेरा आला, सगळे हसायला लागले. छोटा बेडूक पण हसला. परत प्रयत्न केला परत तो पडला परत सगळे हसले. परत काहीतरी सगळ्यांनी मिळून टॉन्ट मारला. परत तो हसला त्याने प्रयत्न केला परत तसंच झालं. हे खूपवेळा सुरु होतं. पण थोडा वेळानंतर छोटा बेडूक खरोखर त्या खोल डबक्यातून जमिनीवर आला. हे छोट्या बेडकांपैकी करणारा तो एकटा बेडूक होता. मोठ्या बेडकांची भरभरून त्याचं कौतुक केलं आणि त्याला महत्वाचा प्रश्न विचारला. तू नेमका जिंकला कसा?मोठा बेडूक म्हणाला, "खाली असलेल्या ९०% बेडकांना इथे उडी मारून येणं शक्य आहे पण ते फक्त आमच्या बडबडीमुळे वर येऊ शकतं नाहीत. आम्हाला हे माहिती आहे आणि प्रत्येकाला वाईट बोलणं ऐकून सुद्धा आपलं आपलं काम करता यावं म्हणून आम्ही रोज हा खेळ घेतं होतो. तुला तर आम्ही इतकं काही बोललो पण तरी तू कसा बाहेर येऊ शकला?"
छोट्या बेडकाने एकच उत्तर दिलं. तो म्हणाला, "तुम्ही मला शिव्या देत आणि टॉन्ट मारतं होते का? मला वाटलं तुम्ही मला वर येण्यासाठी प्रोत्साहीत करतं आहात. मी बहिरा आहे. मी काही ऐकलंच नाही." आहे की नाही गम्मत. पण तुम्हाला वाटेल हे समर्थ रामदास आपल्याला कधी शिकवतात? सांगतो. हे मला समर्थांनी कसं शिकवलं बघा!समर्थांनी एकचं मनाचा श्लोक लिहिला आणि कामं सोप्प केलं. त्यांनी फक्त लोकांनी वाकडं बोलल्यावर ऐकून घे इतकचं नाही तर पुढे काय केल्याने सगळं नीट होऊ शकतं ते पण सांगितलं. कसं ते पुढे वाचा. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें । मना बोलणें नीच सोशीत जावें ॥ स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें । मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥ समर्थ काय सांगतात आपल्या मनाला की, मना एके रे, तू ना कधी पण श्रेष्ठ धारिष्ट जीवाशी धर. धारिष्ट म्हणजे मोठं, महान असं धैर्य घट्ट करून ठेव. पण धारिष्ट तू मनाशी धरलं की असे करणारे सगळे नसतात ना रे, त्या मुळे लोकं तुला बोलतील, नावं ठेवतील. त्या वेळेस काय कर तर लोकांचं जे बोलणं आहे ना ते सोशीत जा. गप चूप ऐकून घे. त्याला इग्नोर करू नको, उलटं-सुलटं काहीही उत्तर देऊ नको फक्त ऐकून घे. तुझा जो काही पॉईंट आहे ना तो स्वयें म्हणजे स्वतः, सर्वदा म्हणेज नेहमी, नम्र म्हणजे आदराने सांगत रहा आणि लोकांना चांगलं वाटेल असंच बोलत रहा.
समर्थ सांगतात की मोठा गोल ठेवा आयुष्यात. टार्गेट असं काही पाहिजे जे ऐकूनच घाबरले पाहिजे काही जण इतका ते मोठं असावं. पण ते टार्गेट ठेवलं की लोकं नावं ठेवणारं, ते ऐकून घे. हे मी का परत लिहितो आहे सांगू का? खूपदा मी पाहिलं आहे कोणी जर त्याला नको असलेलं समोरचा बोलतं असेल तर, "हां...बोल, बोलून घे पाहिजे ते, मी तर ऐकत पण नाही..." असा काही भाव आणतात. ह्याला नीच बोलणे सोशीत जाणे नाही म्हणतं. सोसणे म्हणजे गप-चूप ऐकून घेणे. ह्या वर बरेच जणं म्हणतील, "पण माझा पॉईंट बरोबर आहे मी का ऐकून घेऊ?" नीट समजून घ्या. तुमचा मुद्दा तुम्ही अवश्य मांडा. समर्थ त्याला नाही म्हणतच नाहीयेत. ते सांगत आहेत आधी गप-चूप ऐकून घ्या आणि मग (स्वये सर्वदा नम्र) स्वतः, नेहमी आणि नम्रपणे आपला मुद्दा मांडा. इथे खूपदा बरेच जण काय करतात, "झालं का तुझं बोलून! आता माझं ऐक. दाखवतो तुला एक एक." अशा प्रकारे बोलतात. हा नम्रपणा नाही. स्वये सर्वदा नम्र ह्याच्या मधे इतका मोठा अर्थ लपलेला आहे की अजून एक पत्र लिहावं लागेल. सध्या पुरतं इतकं लक्षात घेऊ आपला मुद्दा मांडताना आवाज हळू पाहिजे, भाषा ही स्वतःच समर्थन करणारी, जस्टिफिकेशन देणारी नसावी, समोरच्याला तोडून काही बोललं गेलं नाही पाहिजे, आणि शांत पणे सांगितलं गेलं पाहिजे. हे केलं तरचं सगळ्यांना छान वाटेल. काय लिहितात ना आपले समर्थ!मी असा सगळा समर्थांनी लिहिलेल्या वेगवेगळे श्लोक, ओव्या, आरत्या, असा सगळ्यांचा अभ्यास सुरु केला आणि मला हे इतकं इंटरेस्टिंग वाटायला लागलं आहे ना की मी अजून असे काही पत्र लिहिणार आहे. ते तुमच्या पर्यंत रविवारी येतील. पण तो पर्यंत तुम्ही जर मनामधे काही श्रेष्ठ असं धारिष्ट घेऊन काम करतं आहात तर तुम्हाला "मना बोलणे नीच सोशीत जावे" हे पटकन समजावं आणि तुम्ही पुन्हा कामाला लागावं हीच माझी इच्छा आहे. खरोखर फार गरज आहे नीच बोलणं सोसता येणाची. दिसतं नाहीत पण शब्द असले लागतात ना. कधी बसला असेल शाब्दिक मार त्यांना समजेल बरोबर.
पण इथेच थांबू नका स्वतः, नेहमी आणि नम्रपणे तुमचा मुद्दा मांडत रहा. आज नाही तर उद्या लोकांच्या मनात तुम्ही घर करणार आणि तुम्ही यशश्वी होणार हे नक्की.शेवटी मी इतकंच सांगेल स्वस्थ रहा, मस्त रहा आणि दासबोध ग्रंथांच्या अभ्यासात व्यस्त रहा. धन्यवाद. आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्याNewsletter ला इथे.👉 Email Newsletter |
We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!