profile

Thoughts become Things!

नोट्स काढणं थांबलं नाही पाहिजे!


।। श्री ।।


सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

आपण सगळे वेळात वेळ काढून माझे पत्र वाचतात ह्याचा मला इतका जास्त आनंद होतो की मी तो सांगू शकत नाही. या शॉर्ट कन्टेन्टच्या काळात कोणी ५-१० मिनिट देऊन माझ्या सारख्या नवीन नवीन लिहिणाऱ्या कोणाचा लेख जर वाचत आहे तर खरंच त्याला मनापासून Thank You म्हणलं पाहिजे.

Thank You दोन गोष्टींसाठी म्हणलं पाहिजे. एक तर प्रत्येक वाचक हा स्वतः मोठा होतो आहे म्हणून. काहीही वाचलं तरी चालेल, रिल्स बघत वेळ घालवण्यापेक्षा वाचन कधीही चांगलंच आहे आणि दुसरं तुम्ही अल्गोरिथम मधे न अडकता जे आवडतं आहे त्याला वेळ देत आहात म्हणून. Algorythmच्या जाळ्यात आपण कसे अडकतो हे समजावून सांगणारं एक पत्र मी लिहिलं होतं त्याची लिंक इथे देतो आहे.

मी लिहिलेलं वाचलंच पाहिजे असं काही नाही. खरं तर तुम्ही आवर्जून वेळ काढून वाचलं पाहिजे, हे घडवून आणणं ह्यातचं माझी स्किल आहे. काम चालू आहे त्या स्किल वर. तुम्हाला मी लिहिलेलं आवडेल किंवा नाही आवडणार तो भाग वेगळा. पण वाचणं आणि त्या बद्दल आपल्या नोट्स काढणं, आपलं मत ठरवणं, आपल्याला आवडलेल्या काही गोष्टी लिहून ठेवणं ह्याचं महत्व खूप खूप जास्त आहे. आज बोलूया ह्याच विषयावर, नोट्स काढणे. खरं सांगा तुम्ही कधी अभ्यास सोडून अजून कश्याच्या नोट्स बनवल्या आहेत का?

आणि हा फोटो इथे का ठेवला आहे मी ते शेवटी सांगतो. 👇

दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हरे तेते

संसार के कठिन से कठिन काम आपकी कृपा से सहजता से पुरे हो जाते है।

टिका करणे

हा मी जो शब्द लिहिला आहे ना टिका करणे हा वाचला की काही तरी निगेटिव्ह टिका केली असेल असं आपोआप येतं ना डोक्यात? टिका ही काही निगेटिव्हच असते असं काही नाही. माझं तसं झालं होतं. आता ज्ञानेश्वरी ही गीतेवर केलेली टिका आहे. खूप जणांना ती गीतेपेक्षा ही जास्त आवडते. किंवा एकनाथी भागवत ही श्रीमद भागवत ह्या ग्रंथा मधल्या अकराव्या अध्यायावर केलेली टिका आहे.

ज्ञानेश्वर माउलींनी नेमकं काय केलं बरं टिका केली म्हणजे? किंवा एकनाथ महाराजांनी नेमकं काय केलं? मी मला समजलेल्या आणि आजच्या भाषेत सांगू? त्यांनी त्यांच्या आवडीच्या ग्रंथावर काढलेल्या नोट्स पब्लिश केल्या. एकदम आजची भाषा वापरतो आहे मी. कारण मला तसंच समजतं.

नोट्स काढणे ही माझ्यासाठी तरी अभ्यास करताना केली जाणारी एक फार मोठी क्रिया होती (मी अभ्यासाला बसलो तर). मला वाचून लक्षात रहात नाही. मी जेंव्हा जेंव्हा वाचलेलं माझ्या शब्दात लिहून काढायचो तेंव्हाच मला ते लक्षात रहायला लागलं आणि जास्त समजायला पण लागलं. अशी माझी नोट्स काढण्याची सुरवात झाली.

तुम्ही कधी काढल्या होत्या नोट्स आठवतं आहे?

अभ्यासाच्या वेळेस मी काढल्या होत्या नोट्स आणि आता मी काढत नाही, असं उत्तर देण्याइतकी ही साधी गोष्ट नाही. आपल्या स्वतःच्या नोट्स काढणे, स्वतःला समजलेलं, आवडलेलं एका वेगळ्या वहीत म्हणा किंवा डिजिटली लिहून ठेवणे ह्या इतकी कमाल गोष्ट कुठली नाही ह्या मताचा मी आहे. तुम्ही स्वतः लिहून बघा आणि मग त्याची जादू बघा.

एक उदाहरण सांगतो. मी मागच्या आठवड्यात लक्ष्मण रेषा या विषयावर माझं एक मत लिहिलं होतं. ते वाचायचं राहून गेलं असेल तर तुम्ही इथे क्लिक करून वाचू शकतात. आता लक्ष्मण रेषेचा मुद्दा मूळ रामायणात नाही. ही एक कल्पना वेगवेगळ्या कथा करणाऱ्यांनी मांडलेली आहे.

आपले ग्रंथ असतील किंवा कुठलंही पुस्तक असेल त्या बद्दल आपलं स्वतःच मत लिहीण, सांगणं ,किंवा त्या वर टिका करणे ही एक फार चांगली सवय आहे. मूळ वाल्मिक रामायणावर केलेल्या काही टिका तर मूळ रामायणा पेक्षा जास्त प्रसिद्ध आहेत. ही सवय आपण ठेवली पाहिजे. मी रामायण वाचून मला समजलेलं, आवडलेलं एका वेगळ्या वही मधे, नोट्स मधे लिहून ठेवतो, झाला अजून एक ग्रंथ तयार. तो किती चांगलं, लिहिलेलं चांगलं का वाईट, पब्लिश करावा का, कोणी विकत घेईल का हा भाग वेगळा. पण स्वतःच्या नोट्स काढण्याची सवय प्रत्येकाला लागली तर काय मज्जा येईल बघा.

हनुमान म्हणजे माझ्यासाठी हनु-MAN

आता मी माझं हनुमान ह्या आपल्या प्रत्येकाच्या आवडीच्या देवावरचा माझं मत सांगतो. बघा आता टीकाकार अजिंक्य कवठेकर काय लिहितात ते. मी लहानपणीपासून सुपर हीरो ह्या कन्सेप्ट चा खूप मोठा फॅन आहे. एक व्यक्ती असतो. तो बाकी सगळ्यांपेक्षा वेगळा असतो. त्याच्या मधे काही खास पॉवर्स असतात. मग तो त्या पॉवर्स सगळ्यांची मदत करायला वापरतो. वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात मग तो ते सगळे एक एक करत आपल्या पॉवर्स नी आणि चतुर बुद्धीने ते संपवतो. हे मी सगळं वेगवेगळ्या सुपर हीरो मुव्हीज मधे पाहिलं आहे.

मला हनुमान नक्कीच लहान पणी पासून माहिती होते. पण मी त्यांना देव म्हणून बघायचो. हनुमान चालीसा आणि भीमरूपी तर रोज म्हणल्याशिवाय मला छान वाटतं नाही. पण एकदा काही तरी बघताना मला जाणवलं हे सुपर मॅन आणि सगळे सुपर हीरो आत्ता आत्ता आले आहेत. आपल्या ग्रंथात तर असे खूप जण आहेत. त्यांच्या बद्दल सगळं लिहून ठेवलं आहे. त्या सगळ्यांपैकी हनुमान हे वाचण्यासारखे आहेत. त्यांच्यात शक्ती आहे. ते विद्यावान आहेत. चतुर आहेत. त्यांना अष्टसिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. गायक आहेत. रामरक्षे मधे तर असं पण म्हणलं आहे हनुमान ही रामपर्यन्त पोहोचण्याची किल्ली आहे.

अश्या प्रकारे माझं बालपण जे बघण्यात गेलं त्यांच्या सोबत मी हनुमान देवाला बघतो. इथे खाली काही चित्र आहेत. ते बघून तुम्हाला समजेल.

सगळे सुपर हीरो हनुमंताला नमस्कार करताना.

व्यायाम करताना खरोखर अश्याच प्रकारे
हनुमान आपल्याला मदत करतात.

सुपरहीरो स्वतः हनुमानाला सीक्रेट विचारताना बघा.

मी सुरवातीला जे चित्र दाखवलं आहे ना ज्या मधे एक मुलगा हात वर करून मला सगळं काही मिळालं अश्या प्रकारचा आनंद व्यक्त करतो आहे आणि त्याच्या बाजूला स्वतः हनुमान उभे आहेत. मी स्वतःला तिथे समजतो. मी हनुमान देवता ह्यावर टिका करणं म्हणजे माझ्या मनातले हनुमान जमेल तितक्या छान पद्धतीने दाखवणं. मला तर काही वर्षात हनुमान या विषयावर कॉमीक्स सुरु करण्याची पण इच्छा आहे. सांगेल ह्या बद्दल पण कधी तरी.

आज हे पत्र वाचून झाल्यावर आपण सगळे मिळून एक काम करूया. माझ्या सगळं लक्षात रहात असं म्हणण्यापेक्षा आज पासून "A small pen is better than long memory" असं म्हणूया आणि आपण सुद्धा आपल्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करू आणि त्याच्या नोट्स पण काढूया. नोट्स काढणे ही तुमची सुपर पॉवर आहे. तिला विसरून जाऊ नका. ही आठवण देण्यासाठी मी आजचं पत्र लिहितो आहे. कोण वाचणार माझ्या नोट्स असा प्रश्न असेल तर मला पाठवा मी वाचेन. पण नोट्स काढा आणि मग जादू बघा.

दृष्टिकोन फार खास असतात आपल्या प्रत्येकाचे. आपण दिसायला नाकी डोळी जरी सारखे असलो तरी आपले विचार हे फार वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाऊ शकतात. त्या मुळे तुमच्या आवडीच्या ग्रंथाच्या तुमच्या नोट्स नक्की काढा. आणि अजून एक ग्रंथच कशाला चित्रपट, डॉक्युमेंट्री, अनुभव, नाटक, गायन, काहीही तुम्ही तुमच्या आवडीचं घेऊ शकतात आणि स्वतःला छान वाटलेलं लिहून काढू शकतात.

भेटूया पुढच्या पत्रात. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या नोट्स काढण्यात व्यस्त रहा. धन्यवाद.

आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्या Newsletter ला.

Email Newsletter
आणि हे पत्र जर नियमित व्हाट्सऍप वर मिळावे असं वाटतं असेल तर ही आहे आमची व्हाट्सऍप कम्युनिटी लिंक इथे.

WhatsApp Community

आणि हो, एक सांगायचं राहील. तुम्हाला जर तुमच्या कुठल्या खास मित्राने हे पत्र पाठवलं आणि हे पत्र वाचून तुम्हाला वाटलं की, "किती सोप्या शब्दात कमीत कमी वेळ घेऊन कसल्या खास गोष्टी समजल्या रे!" माझाव्यापार चे आधीचे पत्र वाचायला मिळतील का? तर ही आहे लिंक​इथे तुम्ही जुने पत्र (लेख, आर्टिकल, Newsletter, ब्लॉग) वाचू शकतात.​

आणि असे खास लेख कधीही वाचायचे राहू नये म्हणून आमच्या पत्राला Subscribe करा.

Reader, एक सांगायचं होतं....

हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.

आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.

माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.

तुमचा मित्र,

अजिंक्य कवठेकर

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page