I write weekly about entrepreneurship, storytelling, books, life lessons, simple thoughts from old Indian texts, and the meaningful experiences in my life. Each article comes from my journey and curiosity.
।। श्री ।। आजचं पत्र म्हणजे फार काही गोष्टी वगरे नाही पण मागच्या रविवार ते कालचा शनिवार ह्या मधे मला काही खूप छान अनुभव आले ते सांगण्यासाठी मी लिहितो आहे. सगळे अनुभव art म्हणजे कलेशी निगडित आहेत. मला खूपदा वाटतं कलेची आणि ती कला निर्माण करणाऱ्या व्यक्तींची प्रशंसा करण्यात आपण सगळे मागे पडतो.
तर आजचं पत्र हे फक्त मला काही भेटलेले, आवडलेले कलाकार आणि त्यांच्या कलेला माझ्याकडून एक सॅल्यूट करण्यासाठी लिहितो आहे. आजच्या पत्रानंतर तुम्हाला पण कुठल्या कलेला appreiciate करावं वाटलं, त्या कलेची प्रशंसा करावी वाटली तर नक्की करा. लेट्स गो!
|
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
लहान मुलं जर कुठल्या गोष्टी कडे आकर्षित होतात तर ते आहे कार्टून्स आणि सुपर हिरो. प्रत्येक लहान मुलाला स्पायडर मॅन आवडतंच असतो. कारण तो वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना भेटतं असतो. जर आपले भारतीय ग्रंथ वाचले तर कुठल्या ही एकाला काही सिद्धी असणे (सुपर पॉवर असणे) हे काही आपल्या साठी नवीन नाही. आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या मारुती रायांचा विचार केला तर त्यांना अष्ट सिद्धी प्राप्त होत्या असं वर्णन सगळीकडे आहे.
पण मग आज लहान मुलांना आवडीचे सुपर हिरो आणि त्यांच्या पॉवर सांग म्हणलं की आपल्या देवांपैकी एकाचेही नाव समोर येतं नाही. चला हे पण मान्य आहे आपण देवांचा आदर करतो म्हणून त्यांना आपण देवघरात, मंदिरात ठेवतो. पण त्यांच्या गोष्टींमधून जे शिकतो त्या शिकवणी पण जर रोजच्या जगण्यात, कामात, गोष्टीत आणल्या नाही तर कसं काय ते सगळे आदर्श वाटतील? ह्याचं कारणामुळे हे सगळे आधी होऊन गेले आता फक्त पुस्तकांमधे आहेत परत होणं शक्य नाही हे विचार आपल्या डोक्यात पक्के बसले आहेत.
पण हे विचार मोडणारा आणि आपले देवच आपले खरे सुपर हिरो आहेत हे सांगणारा "महावतार नरसिम्हा" नावाचा एक चित्रपट आलेला आहे. हा एक ऍनिमेटेड चित्रपट आहे आणि प्रत्येकाने बघावा असं मला वाटतं. जी माझी इतक्या वर्षांची इच्छा होती ती या चित्रपटाने पूर्ण केली. भगवान नरसिंह ह्यांच्यात लहान मुलांना आवडेल असा हिरो दाखवण्याचं काम या चित्रपटाने चोख पणे केलं आहे.
मी जितका अनुभव घेतला आहे ना त्याच्यावरून मला नेहमी वाटायचं की नरसिंह अवताराची कथा ही बाकी सगळ्या कथेपेक्षा किती छान आहे. पण दिग्दर्शक अश्विन कुमार ह्यांनी उत्कृष्ट काम केलं आहे. अगदी प्रत्येकाने बघावं असं आहे. विष्णू भगवान ह्यांचे वराह अवतार, नरसिंह अवतार, श्री कृष्ण अवतार ह्यांना इतकंच सुंदर दाखवलं आहे जे शब्दात मांडता येतं नाही. तुम्ही अनुभव घेऊन या इतकंच सांगू शकेल मी.
![]() |
आणि हा एक चित्रपट नाही या चित्रपटासोबत संपूर्ण महावतार युनिव्हर्स येणार आहे असं त्यांनी सांगून टाकलं आहे. पुढचा चित्रपट हा २०२७ येणार आहे. महावतार परशुराम. सगळे देवांचे अवतार न समजल्या मुळे आपल्या कडे फार गडबड झालेली आहे. हा सगळं गोंधळ अशा प्रकारचे चित्रपट नक्कीच नीट करू शकतात. खूपदा क्रिएटिव्ह लिबर्टी च्या नावाखाली आपल्याकडे चित्रपट जे ग्रंथात लिहिलं आहे ते सोडून भलतंच काहीतरी दाखवतात. पण असं या फिल्म मधे काही दिसतं नाही जे लिहिलं आहे तेच दाखवलं आहे. आपल्या घरच्या सगळ्यांना ही फिल्म बघायला घेऊन जा आणि आवडल्यावर मला नक्की कळवा.
मी मागच्या पत्रात म्हणालो होतो की रविवारी मी लहान मुलांसोबत गप्पा गोष्टी करायला भेटणार आहे तर लिंक मी या पत्रात पण देतो आहे. करून टाका रजिस्ट्रेशन आणि भेटूया आपण रविवारी रात्री ८ ला. भरपूर गप्पा मारूया आणि जे लहान मुलं विसरत चालले आहेत ते त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देऊया.
ही आहे रजिस्ट्रेशन लिंक इथे क्लिक करून रविवारी ८ च्या झूम मिटिंग साठी नोंदणी करा.
आपण भेटूया पुढच्या पत्रात आणि मला फक्त पत्रा द्वारे नाही समोरासमोर भेटायची इच्छा असेल तर तुम्ही रविवारी सुरु होणाऱ्या झूम मिटिंग ला येऊ शकता. मी रजिस्ट्रेशन लिंक दिली आहे. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि महावतार नरसिम्हा चित्रपट बघण्यात व्यस्त रहा. धन्यवाद.
आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.
आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.
I write weekly about entrepreneurship, storytelling, books, life lessons, simple thoughts from old Indian texts, and the meaningful experiences in my life. Each article comes from my journey and curiosity.