profile

Thoughts become Things!

आज बोलूया प्रवासाबद्दल!


। । श्री । ।

Readerसप्रेम नमस्कार विनंती विशेष,

मागच्या दोन्ही आठवड्यात इंफ्लुएन्सर कोण, कोणाला म्हणावं असे काही विषय मांडत मांडत मी आलो आहे प्रवास वर्णनाबद्दल काही तरी बोलायला. (बोलायला म्हणजे मी लिहिणार आणि तुम्ही वाचणार पण आपण समोरासमोर बसून हे सगळं बोलतो आहे असा फील यावा म्हणून मी बोलायला आलो आहे असं म्हणालो.)

मागच्या आठवडयात मी ट्रिपला गेलो होतो. आज काल ट्रिपचे पण इतके प्रकार निघाले आहेत ना, काही वर्षांपूर्वी नव्हते हे प्रकार. आधी फक्त vacation असायचं आता Statacion, wokcation, आणि अजून काय काय प्रकार निघाले आहेत. पण मी vacation साठीच गेलो होतो. मी कधी कुठले प्रवास वर्णनं वाचले नाहीत, त्या मुळे मला माहीत नाही की कसं लिहावं ते. पण मी काहीतरी वेगळंच observe करतो. आज त्या बद्दलच एक सांगायचं आहे तुम्हाला.

महा-शिवरात्रीला मुरुडेश्वरला असणे!

कोणी योगायोग म्हणतात, कोणी म्हणतात प्लॅन केल्या शिवाय होतं नाही पण मी म्हणतो, "A single Blade of Grass cannot move without his will." मला गर्दीच्या ठिकाणी कधीही जावं वाटतं नाही. पण मुरुडेश्वर सारख्या जिथे भगवान शंकरांची १२३ फूट मोठी मूर्ती आहे आणि जे शंकराचं आत्मलिंग असलेलं स्थान आहे म्हणतात तिथे महाशिवरात्रीला गर्दी नसणार तर कुठे असणारं.

गाडी हॉटेलला जाई पर्यंत धाक धुक चालू होती की गर्दी मधे गाडी तरी जाऊ देतील का? पण गर्दी मुळे गाडी पुढे जात नव्हती म्हणून मी गाडीतून उतरलो आणि RNS रेसिडेन्सी नावाच्या हॉटेल मधे माझी बुकिंग आहे, सोबत फॅमिली आहे असं पोलीस मामांना सांगून त्यांना हॉटेल चे बुकिंगचे पेपर जसे दाखवले आमची गाडी गर्दीमधून जागा करून हॉटेल पर्यंत पोहोचली. माझ्या साठी हे नवल होतं. "हॉटेलचं बुकिंग असेल म्हणून कदाचित सोडलं" असा विचार करून मी बाकी सगळं फिरण्यासाठी निघालो.

जे काही बीचच्या बाजूला छोटे छोटे दुकानं होते तिथल्या बऱ्याच दुकानांच्या मधे मला देवांच्या फोटो सोबत अजून एक फोटो दिसत होता एका काकांचा. ते कोण आहे, का बरं हा फोटो आहे हे मला काही माहिती नव्हतं. पण एकच गोष्ट परत परत दिसायला लागली तर काय आहे नेमकं असा प्रश्न पडतो ना तसा प्रश्न मला पडायला लागला. मग मी त्यांचं नावं वाचलं जे फोटो खाली लिहिलं होतं. R N Shetty. माझ्या डोक्यात अजून पण ट्यूब पेटली नाही.

इथे पेटली माझी ट्यूब

मी हॉटेलला परत आलो तर तिथे पण शेट्टी काकांचा मोठ्ठा फोटो होता. मला परत प्रश्न पडायला लागले आणि मी रिसेप्शन वर माझ्या रूम ची किल्ली घेण्यासाठी आलो तर मला तिथे एक पुस्तक दिसलं. त्या पुस्तकावर पण शेट्टी काकांचा फोटो होता आणि खाली पुस्तकाचं नाव लिहिलं होतं, "I'll do it My Way"

आता सगळ्या तारा जुळायला लागल्या. RNS रेसिडेन्सी हे त्यांचं हॉटेल होतं. हॉटेलचा प्रत्येक स्टाफ हा खूप छान बोलणारा होता. हॉटेल हे मुरुडेश्वरला अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. हॉटेलच्या जागेलाच १० पैकी १०० मार्क्स द्यावे इतकी छान ती जागा आहे. त्याच्या वर तिथले काम करणारे लोकं, तिथलं जेवण, स्वच्छता, सगळंच कमाल होतं. आता उत्सुकता वाढायला लागली की कोण आहे हा बिझनेस मॅन. वाचू ह्यांच्या बद्दल आपण.

मी पुस्तक घेऊन वाचायला सुरवात केली आणि मी थक्क झालो. आज मुरुडेश्वर जे काही आहे. मुरुडेश्वर हे एक खूप पवित्र असं धार्मिक स्थान तर आहेच. पण मुरुडेश्वरला एक टुरिस्ट प्लेस ही ओळख निर्माण करून देणारे डॉक्टर आर. ऐन. शेट्टी आहेत. एका समुद्र किनाऱ्याला एका व्हिजन ने बघणे आणि तसं च्या तसं उभा करणे हे खरोखर शिकण्यासारखं आहे. आता मला समजलं का बरं प्रत्येक दुकानात काकांचा फोटो होता ते. शेट्टी काकांनी एक स्वप्न पाहिलं ते खरं केलं आणि आज त्या मोठ्या स्वप्नामुळे जवळपास ५०० कुटुंब त्यांच्या वेगवेगळ्या व्यवसायामुळे मोठे झाले आहेत.

त्यांच्या पुस्तकामधे त्यांचे एक मित्र लिहितात की एकदा R.N. शेट्टी मलेशियाच्या ट्रिप वरून परत आले आणि तिथली hospatility Industry बघून ते खूप उत्साहीत होते. मलेशिया मधे जश्या टुरिस्ट लोकांना सोयी केलेल्या आहेत तश्या आपल्या कडे का नाही? हा त्यांचा पहिला प्रश्न होता. इतकी मोठी टुरिस्ट इंडस्ट्रीची ग्रोथ बघून त्यांनी तशीच ग्रोथ आपल्या गावात आपण करू असं ठरवलं आणि मग त्या नंतर आज जे मुरुडेश्वर आहे ते आपण अनुभवू शकतो.

कीर्ती मागे उरावी!

I'll do it My Way ह्या पुस्तकात कमीत कमी २०० जणांनी त्यांच्या ८५ व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना एक पान भरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक पान जवळ जवळ हेच सांगत आहे की शेट्टी दादा खूप साधे होते. "साधी रहाणी आणि उच्च विचार सरणी" त्यांच्या कडे होती. ते सकाळी लवकर उठतं होते. ते लोकांवर खूप जास्त प्रेम करत होते.

एका इंजिनियर ने त्याच्या शुभेच्छां मधे असं पण लिहिलं आहे की मी एकदा ट्रेन नी सकाळी गावात आलो कारण मला एक नवीन प्रोजेक्ट च काम करायचं होतं R.N. शेट्टी ह्यांच्या कंपनी सोबत. सकाळी ७ वाजता दादा मला स्टेशन वर घेण्यासाठी आले. माझी ती त्यांना भेटण्याची पहिलीच वेळ होती आणि त्यांच साधं जीवनच मला मनापासून आवडलं.

शंकरांच्या मूर्तीच्या खाली शेट्टी दादांचा पण एक पुतळा बनवलेला आहे. त्या पुतळ्यावर लिहिलं आहे, "What we have done for ourselves alone dies with us, What we have done for others and the world remains and is immortal." हे वाचल्या वाचल्या मला काय आठवलं माहिती का?

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी ।

मन सज्जना हेची क्रिया धरावी ।।

समर्थ रामदासांनी किती स्पष्ट सांगितलं आहे ना आपल्या सगळ्यांना. ते अगदी प्रेमाने मनाला म्हणतात की, "अरे मना ऐक रे, आज नाही तर उद्या हा जो देह (body) आहे तो तूला सोडावा लागणारच आहे रे, त्यामुळे तू असं काही तरी कर की तुझ्या त्या कामामुळे सगळे जण तुला लक्षात ठेवतील, तू गेलास तरी तुझी कीर्ती मागे उरली पाहिजे.

आणि शेट्टी दादांच्या पुतळ्याखाली लिहिलं आहे स्वतःसाठी केलेलस सगळं स्वतःसोबत मरून जातं, दुसऱ्यांसाठी केलेलं उरून रहात आणि ते अमर रहात. आहे ना साम्य? म्हणून मला कधी कधी यशश्वी लोकांचा अभ्यास करणे आणि आपले ग्रंथ वाचणे हे खूप सारखं वाटतं.

प्रवास हा चालूच असतो!

प्रवास म्हणलं की कार, किंवा रेल्वे किंवा विमानात बसून कुठे तरी जाणे मग फोटो काढणे, ते फोटो सगळ्यांना पाठवणे, खरेदी करणे हे सगळं आहेच पण ती एखादी जागा कशी काय मोठी झाली, काय काय होतं गेलं हे समजून घेण्यात मला जास्त इंटरेस्ट असतो. मी मागच्या वर्षी एक गोष्ट लिहिली होती प्रवासाबद्दल ती तुम्ही यु ट्यूब वर ऐकू शकतात. गोष्टीचं नाव आहे "Travelling makes you Rich"

प्रवास हा vacation वाला असेल किंवा आयुष्याचा असेल एक गोष्ट आपण सगळे शेट्टी काकांकडून शिकू शकतो ती म्हणजे आपण दुसऱ्यांसाठी केलेलं प्रत्येक काम हे कधीच नष्ट होतं नाही. आपण सगळे जण दुसऱ्यांना मदत होईल असं काय काय करू शकतो ह्याचा विचार करून शक्य तितके प्रयत्न करत राहूया.

तुम्ही सुद्धा जर कधी बीच ला जाण्याच्या विचारात आहात तर मुरुडेश्वर ही जागा अगदी योग्य आहे. बीच, museum, फोटो साठी छान जागा, स्कुबा डायविंग, वॉटर स्पोर्ट्स, फिश आणि व्हेज फूड, खरेदी आणि ह्याच्या पेक्षाही छान म्हणजे १२३ फूट उंच शंकरांचं दर्शन. तुम्हाला सुद्धा शेट्टी काकांचे फोटो सगळीकडे दिसले तर मला तुमचा अनुभव नक्की सांगा.

नोट: असं नका वाटू देऊ मला हॉटेल वाल्या लोकांनी काही स्पेशल डिस्काउंट दिल म्हणून मी हे सगळं लिहितो आहे. मला आवडलेली गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहचावी म्हणून हे सगळं लिहिलं.

मुरुडेश्वर ची सकाळ अशी दिसते.

सगळ्यात मोठं गोपुर!

प्रत्येकाने बघावी अशी शंकरांची मूर्ती.

स्वच्छ समुद्र किनारा



शेवटी मी इतकंच सांगेल स्वस्थ रहा, मस्त रहा आणि प्रवास करण्यात व्यस्त रहा. धन्यवाद.

आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्या Newsletter ला इथे.

Email Newsletter
आणि हे पत्र जर नियमित व्हाट्सऍप वर मिळावे असं वाटतं असेल तर ही आहे आमची व्हाट्सऍप कम्युनिटी लिंक इथे.

WhatsApp Community

Reader, एक सांगायचं होतं....

हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.

आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.

माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.

तुमचा मित्र,

अजिंक्य कवठेकर

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page