We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!
। । श्री । । सप्रेम नमस्कार विनंती विशेष, Reader स्वागत आहे एका नवीन पत्रात. तुम्ही माझाव्यापारचं पत्र हे एक निमित्त पकडून काहीतरी वाचण्याचा निर्णय घेतला आहे ना त्याला नमस्कार. जे कोणी माझे पत्र वाचून त्यांच्या ओळखीच्यांना ठरवून पाठवतात त्यांना वेगळा नमस्कार आणि एक सॅल्यूट पण. माझं खूप मोठं काम शेअर करणारे करत आहेत तर एक सॅल्यूट तर बनतोच त्या सगळ्यांसाठी. मी इथे स्क्रीनशॉट तुम्हाला बघायला देतो आहे पहिल्यांदा मी इतके views माझ्या ब्लॉगला पहिले असतील.
आजचा विषय तो आहे ज्या वर मागच्या आठवड्यात इंटरनेट आणि न्यूज चॅनेल वर नुसते गोंधळ चालू आहेत. तुम्हाला माहीती नसेल तर सांगतो मागच्या आठवड्यात इंफ्लुएन्सर म्हणजेच यु ट्यूब, इंस्टाग्राम अश्या सोशल मीडिया वर जे कन्टेन्ट बनवतात ते काही क्रिएटर्स एकत्र आले आणि एका कार्यक्रमात ज्याला नवीन भाषेत "रोस्टिंग" म्हणतात ते रोस्टिंग किंवा त्याला डार्क कॉमेडी पण म्हणतात त्या कार्यक्रमात भाग घेतलेल्या काही व्यक्तींसोबत केलं. रोस्टिंग म्हणेजच चिडवणं किंवा एखाद्याला वाईट वाटेल असं बोलणं. त्यांच ते बोलणं इतकंच अभद्र आणि माना खाली घालाव्या लागतील अश्या प्रकारचं होतं की ते ऐकल्यावर बाकी सगळे चिडले. ज्यांनी केलं त्यांनी माफी मागितली पण अजूनही खूप काही काही चालू आहे, नवीन नियम आणणे, पोलीस कंप्लेंट, काही मोठे नेते हा विषय स्वतः बघत आहे, ते सगळे व्हिडिओ यू ट्यूब वरून काढून टाकण्यात आले. ह्या बद्दल थोडं बोलूया. इंफ्लुएन्सर म्हणजे नेमकं कोण?काय शब्द आहे ना? इंफ्लुएन्सर म्हणजे आपल्याला इंफ्लुएन्स करणारा. हा इंफ्लुएन्स त्याच्या गाण्याने असेल, डान्स ने असेल, काही लिखाणातून असेल, काही चांगली माहिती दिल्या मुळे असेल, किंवा काहीही वेडेचाळे केल्या मुळे असेल त्याचे प्रकार खूप आहेत. यु ट्यूबचं बिझनेस मॉडेल काय म्हणतं तुम्ही काहीही बनवा अपलोड करा, खूप सारे लोकं बघायला लागले तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ कारण आम्ही तुमचं कन्टेन्ट बघणाऱ्याला जाहिराती दाखवतो.
आता ज्यांना हे पैसे कमवायचं गणित समजलं त्यांनी व्हिडिओ बनवणं सुरु केलं. यू ट्यूब ने काय सांगितलं आहे जितके जास्त लोकं बघणार तितके पैसे मिळणार. पण हे कन्टेन्ट चांगलं आहे? वाईट आहे? लहान मुलांसाठी आहे? हे नुसतं व्हिडिओच्या आधी लिहिलं जरी असेल तरी फोन कोण हातात घेऊन बघतो आहे त्या वर कोणीच कंट्रोल करू शकतं नाही. हा कंट्रोल नसल्यामुळे त्यांना बनवलेलं कुठलही कन्टेन्ट बघणारे लोकं मिळाले आणि त्या कन्टेन्टचा काय परिणाम होईल, चांगला, वाईट, हा विचार झालाच नाही. हळू हळू करतं हे सगळे इंफ्लुएन्सर मोठे होतं गेले. इतके मोठे झाले की खूप सारे तरुण मुलं आपण पण ह्यांच्या सारखं एक बनू म्हणून त्यांच्याकडे बघायला लागले. त्यांना आपले रोल मॉडेल म्हणून बघायला लागले.
बऱ्याच जणांचं कन्टेन्ट बघताना असं होतं! फिल्म्स किंवा सोशल मीडिया ही दिखाव्याची दुनिया आहे कोण खरं कोण खोटं सांगणं फार कठीण आहे. त्या म्युझिक मुळे, स्टोरी मुळे, कॅमेरा इफेक्ट्स मुळे, कलाकारांच्या ऍक्टिंग मुळे आपण स्वतःला तो हिरो, ती हिरोईन समजायला लागतो. मग ते २-३ तास आपण वेगळ्याच एका जगात जाऊन परत येतो. सगळं खोटं आहे माहिती असून आपण इतके त्या मधे अडकतो. हीच तर कला आहे प्रत्येक कलाकाराची. मी इंफ्लुएन्सर्स ना वाईट म्हणतो आहे असं बिलकुल समजू नका. खूप अवघड असं क्षेत्र आहे ते. जे कोणी मेहनत घेऊन करतं आहेत ते खरोखर ग्रेट आहेत. पण इतक्या सगळ्या कन्टेन्ट च्या गर्दी मधे आपल्या हिताचं काय आणि काय नाही हे काही इथे समजत नाही. You guys are too much!टू मच करतात यार हे मोठे लोकं. काय होतं अभद्र, शिव्या देणारं, घाणेरडं, कन्टेन्ट सतत बघितलं तर? मी माझा आभ्यास, माझं काम सगळं संपवून थोडावेळ टाइम पास म्हणून बघतो आहे. मला माहिती हे सगळं फालतू आहे ते. पण तितकीच मज्जा आणि टाइम पास.
फोन बाजूला ठेव म्हणलं की घरातले लहान मुलं असं करतात ना! काहीही फालतू बघत जाऊ नको, हे असं जर तुमच्या जवळचे कोणी सांगत असतील ना तर ही गोष्ट लक्षात घ्या जी देवी भागवतात येते. मी ती पूर्ण गोष्ट सांगत नाहीये ती गोष्ट सांगताना माझी कशी विकेट उडाली आणि आईने कसं आऊट होण्या पासून वाचवलं ते सांगतो. मी माझ्या भाच्चा, आणि भाच्ची दोघांना गोष्ट सांगत होतो. "तुम्हाला माहिती का दोन राक्षस होते. त्यांचं नाव होतं मधू आणि कैटभ. ते दोघे, विष्णू देव आहेत ना आपले त्यांच्या कानातून प्रकट झाले होते." आता हे सांगतांना माझे दोन्ही भाच्चे आता मोठे झाले आहेत हे मी विसरलो. आधी मी जे काही सांगेल त्याला हो हो करत माना हलवणारे दोघे आता प्रश्न विचारणारे झाले आहेत. दोघे म्हणाले, "मामा काही पण सांगतो. असं कसं कोणी कानातून येईल?" ह्या सगळ्या गप्पा चालू असताना बाजूला बसलेली त्यांची आज्जी म्हणजे माझी आई ऐकत होती. ह्यांना काय उत्तर द्यावं तेच मला समजेना. पुढची गोष्ट जाऊ द्या आधी ह्यांना पटेल, आवडेल असं उत्तर तर द्यावं लागेल. पण आई ची एंट्री झाली. आई म्हणाली, "असे कसे कानातून आले विचारतं आहात ना दोघं? मी सांगते. वाईट वागणं, काहीतरी चुकीचं करावं वाटणं, हे जे विचार आहेतं ना हे सगळे वाईट ऐकण्यातून येतं असतात. तुम्ही सांगा कोणी जर रामायण ऐकलं असेल तर त्याला असा काही वाटेल का? सगळे कसे छान वागतात रामायणात. रामायण म्हणजे कोण किती चांगलं वागतो ह्याची स्पर्धा आहे असं वाटतं कधी काही इतके सगळे चांगले वागतात. आणि जे कोणी हे असेल मारा मारी, घाण बोलणं, भांडण करणं असलं सगळं बघतात ते काय करणार?" तिघांच्या डोक्यात प्रकाश पडला तो तिसरा म्हणजे मी आहे. पुढे आई म्हणाली, "कानातून प्रकट झाले म्हणजे त्यांनी वाईट ऐकलं म्हणून ते राक्षसी वृत्ती घेऊन बाहेर आले. वाईट ऐकलं की राक्षस बनतो माणूस हे समजावं म्हणून ती कथा सांगितली जाते. Learn to read between the lines. आता सांगा तुम्ही चांगलं ऐकणार का वाईट?"
आता तुम्ही सांगा कोण करतं आहे too much? रोज थोडा थोडा वेळ स्वतः ला काही तरी फालतू दाखवायचं आणि मग त्याचा रिझल्ट दिसला की चमकू नका. उद्या राक्षस वृत्ती दिसायला लागली तर आधी स्वतः जे दिवस रात्र बघतात ते कन्टेन्ट चेक करा. घाणेरडं अन्न पोटाला नाही, तसचं मनालाही नको!लहान मुलांना आपण काय खावं, काय नाही ते शिकवतो ना? खाली पडलेलं खाऊ नको. अगदी महागाचं चॉकलेट जरी मातीत पडलं असेल तर खाऊ नको पोट खराब झालं किंवा आजारी पडला तर जास्त त्रास होईल. मग मला सांगा हे सगळं कन्टेन्ट पोटात नाही डोक्यात जातं आहे. एकवेळ पोटाचं दुखणं बरं, विचार करा डोक्यात काही कीड गेली तर ती काढणं किंवा त्यावर काही उपाय करणं किती अवघड गोष्ट आहे.
प्रत्येकाने मनोरंजनाची स्वतःला एक लिमिट लावून घ्यावी आणि ते मनोरंजन आपल्या लिमिटच्या बाहेर जात असेल तर स्वतःला आणि आपल्या सोबतच्या सगळ्यांना ते मनोरंजन तिथेच कसं थांबवायचं हे शिकलं आणि शिकवलं पाहिजे. हसू येतं म्हणून उगीच शिव्या देणारे कार्यक्रम मी बघणारं नाही ही समज स्वतःला आणि सोबतच्या सगळ्यांना द्यावी. कशी द्यावी हा पण मोठा विषय आहे. पण शेवटी तुम्ही स्वतंत्र आहात पाहिजेल ते बघायला. मी फक्त माझा पॉईंट ऑफ व्हियू मांडतो आहे. एक मस्त यु ट्यूब चॅनेल सांगतो, नक्की बघा.YouTube वर एक चॅनेल आहे ज्याचं नाव आहे 21Notes. ह्या चॅनेलच्या माहिती मधे ते लिहितात आम्ही ह्या चॅनेल वर वाल्मिकी रामायण सांगतो ते पण एकविसाव्या शतकातल्या लोकांसाठी. ह्या चॅनेल मधल्या व्हिडिओ मधे वाल्मिकी रामायणातले महत्वाचे श्लोक आपल्याला बोलून दाखवले जातात त्याच बरोबर मागे एक ऍनिमेशन द्वारे रामायणाची गोष्ट दाखवली जाते आणि मधे मधे काही प्रश्न पण विचारून त्यांचे उत्तरं दिले जातात. आणि कुठलाही व्हिडिओ हा १० मिनिटांच्या वर नाही त्यामुळे जर कोणाला सवय नसेल मोठे व्हिडिओ बघण्याची तर तो सुद्धा एक बघण्यात गुंग होतो. पुन्हा ह्या रामायणातले संस्कृत श्लोक आपल्याला स्क्रीन वर दिसतात आणि त्याचे अर्थ हे इंग्लिश आणि हिंदी अश्या दोन्ही भाषेमधे उपलबद्ध आहेत.
Click here to open this Channel वाल्मिकी रामायणाची सोप्या भाषेत, नवीन पिढीला आवडेल अश्या पद्धतीने ओळख करून घ्यायची असेल तर हे चॅनेल नक्की बघा. छान प्लेलिस्ट आहेत प्रत्येक प्रसंगाच्या आणि सोप्या भाषेत समजून सांगितलं आहे. अरे एक राहिलंच की,इन्फ्लुएन्सर आहे कोण मग नेमकं? ह्या पत्राच्या कंमेंट मधे मला सांगा. इतके सगळे जण आहेत. नेते, ऍक्टर्स, सिंगर्स, क्रिकटर, डॉक्टर्स, ईजिनयर्स, वकील, चित्रकार, शात्रज्ञ किंवा ऋषी, संत, आई, बाबा, मित्र कितीतरी जण आहेत ना? कोणाला म्हणावं इंफ्लुएन्सर. विचार करा, तुम्हाला उत्तर मिळालं तर मला कंमेंट मधे सांगा. मी माझं उत्तर पुढच्या पत्रात देतो. शेवटी मी इतकंच सांगेल स्वस्थ रहा, मस्त रहा आणि चांगलं कन्टेन्ट बघण्यात व्यस्त रहा. धन्यवाद. आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्या Newsletter ला इथे. आणि हे पत्र जर नियमित व्हाट्सऍप वर मिळावे असं वाटतं असेल तर ही आहे आमची व्हाट्सऍप कम्युनिटी लिंक इथे.
|
We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!